Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगाव - कराड एसटी बस सुरू; नागरिकांमध्ये समाधान शालेय विद्यार्थी व नागरिकांची येण्या-जाण्याची गैरसोय दूर होणार



 बुध दि [प्रकाश राजेघाटगे  ] 


पुसेगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वेळोवेळी पुसेगाव ते कराड एसटी बस सुरू करावी या मागणीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून सोमवारी   पुसेगाव कराड बस सुरू करण्यात आली .ही बस सुरू करण्यात आल्याने पुसेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

पुसेगाव वरून कराडला जाणारी एकही एसटी बस नव्हती . त्यामुळे या परिसरामध्ये पुसेगाव, जाखणगाव ,चौकीचा आंबा, जायगाव ,औंध, पुसेसावळी, कराड या ठिकाणी जाण्यासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना तासन तास खाजगी वाहतुकीची वाट पहावी लागत होती. त्यामुळे वेळ व पैसा दोन्हीही वाया जात होते. पुसेगाव ग्रामपंचायत, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या मागणीवरून वडूज आगाराची पुसेगाव कराड एसटी बस सोडण्यात आली असल्याचे एसटी कर्मचारी गणेश जाधव यांनी सांगितले. या एसटीच्या दिवसातून चार खेपा करण्यात येणार आहे. त्यांच्या वेळा अजून निश्चित करण्यात आले नाहीत. एसटी कर्मचारी व परिसरातील नागरिकांच्या सल्ल्याने या वेळा फिक्स करण्यात येणार असल्याचीही एसटी कर्मचारी गणेश मदने यांनी माहिती दिली असून  पुसेगाव कराड एसटी बस सुरू झाल्याने या मार्गावरील जाणाऱ्या नागरिकांचा बऱ्याच अंशी प्रश्न सुटला आहे त्यामुळे नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.