प्रतिनिधी.शेख इमरान
सुलतानपूर (ता. लोणार) : श्री सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सुलतानपूर येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
पाचवी चे 8 तर आठवी 12 या दोन्ही स्तरांवरील परीक्षेत एकूण 20 विद्यार्थ्यांनी यश मिळवून विद्यालयाचा झेंडा उंचावला आहे. विद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सतत परिश्रम करून उज्ज्वल यश संपादन करत आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पाचवीच्या परीक्षेत, कु. जयश्री केशव सोनुने , कु. प्रथमेश रविंद्र बाजड , कु. माही नितीन भटकर, कु.ईश्वरी श्रीराम मोठे , कु. प्रथमेश राजेश बोबडे, कु. अतुल शाम अवचार, कु. अंकिता अनंथा धांडे , कु. विशाल चंदू शिराळे, यांनी उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.
आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कु. स्वराज शिवाजी दाभाडे , कु. सृष्टी विजय काळे, कु. अंकित अनिल पनाड, कु. धनराज विष्णू कुटे, कु. सार्थक ज्ञानेश्वर गाढवे, कु. दिव्या गजानन दाभाडे, कु. रिया गोपाल ढवळे, कु. प्रिती किसन भालेराव, कु. अनुष्का राजु माळोदे, कु. यश ज्ञानेश्वर सुरूशे, कु. ओमकार फकिरा गावंडे, व कु. धनश्री समाधान हरकाळ, यांनी यश मिळवले आहे.
विद्यालयाचे .संस्था अध्यक्ष डॉ. वसंतराव देसाई, सचिव माधवराव झोरे भाऊसाहेब, तथा समस्त संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .तसेच विद्यार्थ्याचे यशाबद्दल प्राचार्य धांडे सर, व पर्यवेक्षिका, शिक्षक यांनी घेतलेल्या मेहनतीचे गोड कौतुक केले. विद्यार्थ्याच्या यशाबद्दल परिसरात विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
Social Plugin