देगलूर :-प्रतिनिधी - जावेद अहेमद
अलीकडच्या काळात समाजात असंख्य गरीब, निराधार व वृद्ध रुग्ण अनेक गंभीर आजाराने त्रस्त असतात.अशा रुग्णावर मोफ़त शस्त्र क्रिया करने हीच खरी समाज सेवा आहे. देगलूर येथे गेल्या १५ वर्षापासून कै. नारायणराव चिद्रावार स्मृती प्रीत्यर्थ पूर्णत: मोफ़त शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले जाते हीच खरी समाजसेवा आहे. आज सर्व वयोगटातील नागरिकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक असुन गरीब रुग्णांची सेवा केली निस्वार्थरित्या झाली पाहिजे असे प्रतिपादन जीतैश अंतापुरकर याँनी केले आहे. ते देगलूर येथे कै.नारायणराव चिद्रावार व्याख्यानमाला समिती व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या शिबिरात एकुण १०४ रुग्णावर मोफ़त शस्त्रक्रिया करण्यात आली. शिबीर उद्घाटण कार्यक्रमात
व्यासपीठावर उपजिल्हा रुग्णालय देगलूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नरेश देवनीकर , राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार , नंदकिशोर दाशटवार माजी नगराध्यक्ष देगलूर नगर परिषद , वाय जी सोनकांबळे , शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील एड. मोहसीन अली , भावना दाशटवार , डॉ. शेख मुजीब , डॉ.उत्तम इंगोले ,डॉ. अविनाश नामावार , डॉ. रवींद्र चिद्रावार , व डॉ.लाडके उपस्थित होते.
आपल्या वडीलांच्या स्मृती प्रीत्यर्थ समाजातील उपेक्षित व वंचित जीवन जगणाऱ्या गरीब रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून वडीलाना वंदन केले पाहिजे, अशी कल्पना डॉ.रवींद्र चिद्रावार यांना सुचली व मागील १५ वर्षापासून भव्य मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जात आहे.आजपर्यंत दोन हज़ारपेक्षा अधिक रुग्णावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यात अपेन्डेक्स, हार्निया ,हायड्रोसील , मुळव्याध,मुतखडा, भगंदर, शिष्ठ ,कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया इत्यादी आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दि. २७ व २८ या दोन दिवसात १०४ रुग्णांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कै.नारायणराव चिद्रावार यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून श्री किरण चिद्रावर यांनी शिबीर आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना असे म्हणाले की, येणाऱ्या पिढीला कै.नारायणराव चिद्रावार यांच्या देगलूर शहराच्या विकास कामाची व दुरद्र्ष्टीची ओळ्ख व्हावी या उद्देशाने अनेक उपक्रम आयोजन समितीच्यावतीने राबविले जातात. कै.नारायणराव चिद्रावार याचां वारसा जपण्याचे कार्य करण्यासाठीच ३९ वर्षापासून व्याख्यानमाला व १५ वर्षापासून मोफत शस्त्रक्रिया शिबिराच्या आयोजन करीत असल्याची माहिती दिली.
याप्रसंगी श्री लक्ष्मीकांत पदम्वार यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हणाले की कै. नारायणराव चिद्रावार हे सर्व धर्म समभावाचे पुरस्कर्ते असलेले एक आदर्श लोकप्रतिनिधी होते. शिवसेनेचे
श्री महेश पाटील भाषण करताना असे म्हनाले की, त् नारायणराव चिद्रावार स्मृतीप्रीत्यर्थ चिद्रावार कुटुंबाने केलेले कार्य हे देगलूरच्या इतिहासात विशेष नोंद घेण्यासाठी आहे, त्यांच्या सामाजिक कार्याचा इतरांनी आदर्श घेणे आवश्यक आहे.
वाय जी सोनकांबले यानी देगलूर येथे मोफ़त व भव्य असे शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केल्याबदल गोर ग़रीब जनतेच्या वतीने चिद्रावार कुटुंबाचे जाहीर आभार मानले
कै. नारायणराव चिद्रावार यांच्या स्मृती प्रीत्यर्थ मोफत रुग्णसेवेचे हे पवित्र कार्य अखंडपणे चालू ठेवणे हीच कै.नारायणराव चिद्रावार यांना खरी श्रद्धाजंली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ संतोष येरावार तर आभार प्रा व्यंकट खंदखूरे यांनी मानले.
दोनदिवसीय शिबीर यशस्वीतेससाठी डॉ.शेख मुजीब, डॉ.लाडके यांच्यासह नांदेड व देगलूर शहरातील तज्ञ डॉक्टर व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. याप्रसंगी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सदस्य गुरुराज चिद्रावार , श्री अरुण चीद्रावार यांच्यासह बहुसंख्य रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते
One attachment
Social Plugin