Ticker

6/recent/ticker-posts

मालेगाव तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजन



*सुटतील समस्या मिळेल आधार..!*


 मालेगाव प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले


मालेगाव :दि 27/4/2025 महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान होऊन जनतेचा वेळ, श्रम पैशांची बचत व्हावी म्हणून सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत मा. दिपक पुंडे तहसिलदार, मालेगांव यांच्या मुख्य उपस्थितीत मालेगांव तालुक्यातील मंडळ स्तरीय समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

मंडळाचे नांव

समाधान शिबीर दिनांक

अर्ज, निवेदन लेखी स्विकारण्याची तारीख खालील प्रमाणे....


*मालेगांव*

 *शिबिर* दि. २९/०४/२०२५

*अर्ज व निवेदन स्वीकारण्याची तारीख*

दि. २१/०४/२०२५ ते दि. २८/०४/२०२५


*मेडशी*

 *शिबिर* दि. ०२/०५/२०२५

*अर्ज व निवेदन स्वीकारण्याची तारीख*

दि. २१/०४/२०२५ ते दि. ०९/०५/२०२५


*करंजी*

*शिबीर* दि. ०५/०५/२०२५

*अर्ज व निवेदन स्वीकारण्याची तारीख*

दि. २९/०४/२०२५ ते दि. ०२/०५/२०२५


*जऊळका*

 *शिबीर* दि. ०६/०५/२०२५

 अर्ज व निवेदन स्वीकारण्याची तारीख 

दि. २१/०४/२०२५ ते दि. ०५/०५/२०२५


*किन्हीराजा*

*शिबीर* -दि. ०७/०५/२०२५

 *अर्ज व निवेदन स्वीकारण्याची तारीख*

दि. २१/०४/२०२५ ते दि. ०६/०५/२०२५


*शिरपुर*

शिबीर -दि. ०८/०५/२०२५

 *अर्ज निवेदन स्वीकारण्याची तारीख*

दि. २१/०४/२०२५ ते दि. ०७/०५/२०२५


*चांडस*

शिबीर दि. ०९/०५/२०२५

 *अर्ज व लेखी निवेदन स्वीकारण्याची तारीख*

दि. २१/०४/२०२५ ते दि. ०८/०५/२०२५


*मुंगळा*

शिबीर दि. ०९/०५/२०२५

 अर्ज निवेदन लेखी स्वीकारण्याची तारीख 

दि. २१/०४/२०२५ ते दि. ०८/०५/२०२५


नागरीकांच्या महसुल विभागाशी संबंधीत असलेल्या कोणत्याही जसे की, रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड वाटप, सामाजिक लाभाच्या योजना जसे, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना इ. तसेच महसूल विभागाशी संबंधीत विविध प्रमाणपत्रांचे वाटप, प्रमाणपत्राबाबत जनतेचे वैयक्तीक अर्ज, तक्रारी, निवेदन (नांव/पत्ता/मोबाईल क्र. नमूद करून) राजस्व मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर स्विकारल्या जातील.

राजस्व मंडळ अधिकारी स्तरावर प्राप्त झालेले जनतेचे वैयक्तीक अर्ज, तक्रारी, निवेदनांवर

समाधान शिबीराचे तारखेपर्यंत निराकरण न झाल्यास प्रत्यक्ष समाधान शिबीराचे दिवशी उपस्थित राहावे.

आयोजक : तहसिल कार्यालय, मालेगांव