प्रतिनिधी--संजय भरदुक मंपिर
मंगरूळपिर ---जे.सी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि आर. जे.चवरे हायस्कूल कारंजा लाड येथे विज्ञान संस्कार शिबिर 2025 मध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर कृषी तंत्रज्ञान व भारतीय कृषी संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आयडॉल शेतकरी शेतीनिष्ठा रवींद्र गायकवाड यांना नैसर्गिक शेती व जलतारा तज्ञ मार्गदर्शक म्हणून बोलावण्यात आले होते सदर विज्ञान संस्कार शिबिरामध्ये शेतीनिष्ठा रवींद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना आदर्श जमीन या संदर्भामध्ये रवींद्र गायकवाड यांनी जलतारा निर्मिती व जलतारा निर्मिती करिता तांत्रिक बाबी व जलतारा वैज्ञानिक दृष्टिकोन व मा. जिल्हाधिकारी भुनेश्ववरी एस. वाशिम जिल्ह्यासाठी चे योगदान व त्यांचे स्वप्न व संकल्पना जलतारा शेतामध्ये कोण्या ठिकाणी असावा
, तसेच राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा योजना व अनुदान आदी विषयाची माहिती विद्यार्थ्यांना दिली एकच नारा प्रत्येक विद्यार्थी करून घेणार आपल्या वडीला कडून शेतामध्ये एकरी एक जलतारा जलतारा हा कन्सेप्ट विद्यार्थ्यांमधील रुजवला तसेच नैसर्गिक शेती व रासायनिक शेती मधील फरक नैसर्गिक शेतीची गरज व फायदे तसेच गांडूळा च्या विविध जाती व त्यांचा जीवनक्रम व त्याची कार्यपद्धती आणि गांडूळ खत निर्मिती गांडूळ खत निर्मिती अर्थशास्त्र व व शेत बांधावरती बायो इनपुट निर्मिती घरच्या घरी बायो इनपुट प्रयोगशाळा यामध्ये ट्रायकोडर्मा निर्मिती घरच्या घरी मायक्रोरायजा निर्मिती रायझोबियम, PSB ,KSB तयार करण्याच्या पद्धती आधी विषयाचे विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले.
विद्यार्थ्यांमध्ये शेती व जलतारा विषयी आवड निर्माण केली शेतीकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलला, रोज पैसे देणारी शेती संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगितले विज्ञान संस्कार शिबिरा करता तालुक्यातील विविध शाळेमधून विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती यावेळी मा. मुख्याध्यापीका यांनी रवींद्र गायकवाड यांचा शाळेच्या वतीने सन्मान चिन्ह व आभार पत्र देऊन सन्मान केला. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाळण्याकरिता जे.सी. हायस्कूल व जुनिअर कॉलेज आणि आर.जे.चौरे हायस्कूल कारंजा लाड येथील इंग्रजी विषयाचे शिक्षक पाडर सर तसेच शिक्षक वृंद मा. मुख्याध्यापिका यांनी अतोनात परिश्रम घेतले.
Social Plugin