Ticker

6/recent/ticker-posts

तिडके पाटील विद्यालयाची स्कॉलरशिप परीक्षेतील उत्तुंग भरारी कायम



पत्रकार:- मोहन जाधव.

चास नळी:- (कोपरगांव) कोपरगाव तालुक्यातील चास नळी येथील रयत शिक्षण संस्थेचे, मारुतीराव दगडूजी तिडके पाटील विद्यालयाने स्कॉलरशिप परीक्षेतील आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी विद्यालयातील आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत ४५ विद्यार्थी पात्र झाले असून, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ९० टक्के लागला आहे. तसेच इयता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ३९ विद्यार्थी पात्र ठरले असून पाचवीचा निकाल ७२.२२ टक्के लागला आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कु.गोडे प्रणिता शिवाजी (२३४) कु.गावंड अक्षदा शुक्राचार्य (२३०) कु.बोराडे रोही रिकेश (२३०) तांगतोडे सिद्धार्थ गणेश(२३०) तिडके श्लोक संदीप (२२८) कापसे तन्मय ज्ञानेश्वर (२२६)कु. गिरीगोसावी अनुष्का रामदास (२२२) धेनक अतिश निलेश(२२०) आढाव देवाशिष संदीप(२१०) शिंदे सोहम सागर (२०४) गुण मिळवून यश संपादन केले आहे. तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये कु.तांगतोडे समृद्धी बापूसाहेब (१८६),  कु.सानप संस्कृती सुरेश (१८६) चांदगुडे प्रिया पवनकुमार (१८०) कु.पायमोडे तन्वी गोविंद (१८०) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी  शिष्यवृत्ती विभाग प्रमुख खोंडे आर.सी.यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यासोबत खोंडे आर.सी.(मराठी) शेख आर.एन.(इंग्रजी) चौधरी एच.एस.(बुद्धिमत्ता) कु. सोनवणे आर.सी.(गणित)

या विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विभाग प्रमुख राऊत एस.एल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तर श्रीम.बागुल जी.एम.(गणित) पारधे ए.एम.(इंग्रजी) श्रीम.शिळकंदे व्ही.ए. (बुद्धिमत्ता) या विषय शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. त्याचप्रमाणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक मांडवडे ए.आर,प्रभारी पर्यवेक्षक चंदने पी.आर, गुरुकुल प्रमुख मोमीन आय.ए के.सर्व ज्येष्ठ शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक, स्कूल कमिटी सदस्य, स्थानिक सल्लागार मंडळ सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती,शाळा व्यवस्थापन व विकास समिती,माता पालक संघ,माजी विद्यार्थी संघ,विभागीय गुणवत्ता कक्ष व पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी हितचिंतक आदी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.