बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
बिलोली तालुक्यातील अटकळी जिल्हा परिषद शाळेत अटकळी येथील माजी सरपंच (प्र) शिवाजी पाटील डोंगरे यांची मुलगी कु. श्रद्धा शिवाजी डोंगरे ही गावातीलच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतून इयत्ता पाचवी वर्गातून महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षा दिली होती.
त्या परीक्षेचा निकाल २५ रोजी जाहीर झाले असल्याने तिने या परीक्षेत २९८ गुणापैकी तब्बल १९८ गुण मिळवत शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरत इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. वर्ग शिक्षीका खैरगावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली श्रधा हिने यश संपादन केले तिने मिळवलेल्या या यशाबद्दल मुख्याध्यापक मारतळे, सलगरे, शालेय समिती अध्यक्ष मारोती पोलकमवाड,माजी सरपंच (प्र) शिवाजी डोंगरे, चव्हाण,भेलोंडे, मुनेश्वर, मारमवार इडलवार सर्व शिक्षक व शिक्षिका आदीनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
Social Plugin