Ticker

6/recent/ticker-posts

अपघातग्रस्त रेखा निंबाळकर यांना तात्काळ मदत...



खासदार *संजयभाऊ देशमुख* यांच्या पुढाकाराने ५० हजार रुपयांची मदत मंजूर.

 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस.दि. २६ :* मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख श्री रामेश्वर नाईक यांच्या तत्परतेमुळे राज्यातील हजारो रुग्णांना वेळेत आर्थिक मदत मिळाल्याने त्यांच्यावर उपचार होत आहेत.व त्यातून हजारो रुग्णांचे प्राण वाचत आहे.याची प्रचिती दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रेखा शिवलिंग लिंबाळकर (वय ४५, रा. देऊरवाडी, ता. आर्णी) जि.यवतमाळ यांना झाली.

माहूरगड येथील रेणुका मातेचे दर्शन घेऊन दुचाकीहून परत येणाऱ्या दुचाकीच्या समोर अचानक वानर आल्याने दुचाकीचा अपघातात झाला. या अपघातात दुचाकी चालवणारा रेखा यांचा लहान मुलगा किरकोळ जखमी झाला. तर मागे बसलेली आई रेखा शिवलिंग लिंबाळकर (वय ४५ रा.देऊरवाडी ता. आर्णी ,जि. यवतमाळ ) यांच्या डोक्याला जबर दुखापत होवून त्या जागीच बेशुद्ध झाल्या.

पुढे त्यांना तत्काळ यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून पुढे नांदेड येथील यशोसाई रुग्णालयात दाखल करुण्यात आले. पुढे तपासणीत त्यांच्या मेंदूला मार लागल्याचे निदान झाले. मेंदूला जबर मार लागल्याने त्यांच्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती.

शास्त्रक्रियेसाठी मोठा खर्च लागणार होता. ना वडिलोपार्जित शेतजमीन ना प्रॉपर्टी त्यात पती मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे. दोन मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्याने लिंबाळकर यांची मुलं कुटुंबाला हातभर लावण्यासाठी पुणे येथील खासजगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. घासतनेची माहिती मिळताच मोठ्या मुलाने गावी धाव घेतली. आर्थिक परस्थिती बिकट त्यात आईच्या शास्त्रक्रियेसाठी मोठा खर्च होणार असल्यासने मुलाने स्थानिक खासदार संजय देशमुख यांना भ्रमणध्वनीवर हि माहिती दिली व मदतीसाठी विनंती केली तेव्हा खासदार संजयभाऊ देशमुख यांनी तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक व अँड विशाल ठाकरे यांचेशी संपर्क साधून रेखा शिवलिंग निंबाळकर यांना तातडीने मदत मंजूर करण्याबाबत विनंती केली व पाठपुरावा केला असता मा . मुख्यमंत्री यांचे आदेशानुसार रामेश्वर नाईक व अँड.विशाल ठाकरे यांच्या सहकार्याने 50,000/ रुपये ची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी खासदार संजयभाऊ देशमुख,रामेश्वर नाईक कक्ष प्रमुख मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व अँड विशाल ठाकरे यांचे आभार मानले.