साहेबराव अंभोरे @ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PUP) इ. 5 वी 2025 मध्ये जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा,पांगरखेड चे १३ पैकी १२ विद्यार्थी पात्र झाले आहेत.
पात्र विद्यार्थी आदिरा प्रमोद शिंगणे ,अक्षरा ज्ञानेश्वर ठाकरे ,आरती शाम मांजरे ,ईश्वरी शाम क्षीरसागर ,ईश्वरी गणेश लोखंडे ,निकिता महादेव वाघ ,रूपाली रविंद्र मांजरे ,सत्यम पंढरी पोधाडे ,सृष्टी सुधाकर हिवराळे ,सृष्टी उमेश सुर्वे, स्वर्णिम अलंकार सुर्वे,उदय राजू सवडतकर या सर्वांचे शा.व्य.स.व शाळेकडून पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मुख्याध्यापक सुकनंदन हांडे, पदवीधर शिक्षक साहेबराव अंभोरे, शिवाजी कानकटाव, स.अ.दत्तात्रय आखाडे, राजेंद्र राऊत,भिमराव सदार, छाया सातपुते आणि शिक्षणतज्ञ विष्णू गांजरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Social Plugin