प्रतिनिधी--संजय भरदुक मंपिर
मंगरूळपिर--कोठारी येथील महात्मा फुले विद्यालय मध्ये शिक्षक या पदावर कार्यरत असलेले श्री संजय धामणकर सर यांची कन्या कु. डॉ अश्विनी संजय धामणकर हिने नुकत्याच झालेल्या २०२४ च्या परीक्षेत ५८२ क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे.तिने अथक परिश्रमाने यश संपादन केले प्राथमिक शिक्षण मंगरूळपिर शहरातच घेतले असून डॉ बीडीएस नागपूर येथे केले असून त्यावर समाधान न राहता आपण वेगळे काही केले पाहिजे या विचाराने युपीएससीच्या परीक्षेची घरीच ऑनलाईन लॅपटॉप घेऊन प्रामाणिक प्रयत्न सतत अभ्यास करत आईवडीलाचे स्वप्न पूर्ण साकार केले. हे अत्यंत गौरवास्पद असून वाशिम जिल्हा मध्ये नाव रोशन केले.आईवडील यांच्या कष्टाला यश मिळाले या तिच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचं भरभरून कौतुकाची थाप देऊन तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.
Social Plugin