Ticker

6/recent/ticker-posts

वारकरी संप्रदायातील थोर संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी मेडशीत साजरी



 मालेगाव प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले

संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते.पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे वीस अभंग आज आपल्याला पहायला मिळतात.संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे वडील होते.संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते.त्यामुळे सर्व संतांनी त्यांना “काका” ही उपाधी बहाल केली होती.

संत गोरोबा काका ज्यांना गोरा कुंभार म्हणूनही ओळखले जाते. हे वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध संत होते.ते एक कुंभार होते आणि विठ्ठलाचे भक्त होते.त्यांनी अनेक अभंग लिहिले आणि गायले,तसेच भागवत धर्माचा प्रसार केला.

ते आपल्या कुंभार व्यवसायातून स्वतःचे घर चालवत होते आणि त्याच वेळी ते संतांच्या मार्गावर चालत होते.ते विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांनी अनेक अभंग लिहिले आणि गायले.त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला आणि लोकांना चांगले जीवन जगण्याची प्रेरणा दिली.

त्यांची समाधी तेर गावी उस्मानाबाद जिल्हा येथे आहे.त्यांच्या जीवनावरील अनेक कथा प्रसिद्ध आहे.त्यांच्या जीवनातील कथा त्यांच्या भक्तीचे आणि त्यागचे उदाहरण आहेत.अश्या महान संताची पुण्यतिथी मेडशी येथे दरवर्षी मोठ्या थाटाने व उत्साहाने साजरी केली जाते.आणि गावातील कुंभार बांधवा कडून हया दिवशी सर्व गावकरी मंडळी करिता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.