बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
साहित्य म्हणजे समाज मनाचा आरसा असतो .समाजाचे दर्शन साहित्यातून घडत असते. त्याचबरोबर मानवी मूल्यांचे प्रतिबिंब ही साहित्यातून उमटत असते असे प्रतिपादन प्रोफेसर डॉ. एस.बी. बिरादार यांनी केले.कला व वाणिज्य महाविद्यालयात 'साहित्य, समाज, व्यवसाय आणि मानवी मूल्ये' या विषयावरील एक दिवसीय आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत बीजभाषण करताना ते पुढे म्हणाले,साहित्य आणि समाज यामध्ये घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे समाजाला दिशा देण्याचे कार्य साहित्य करते. साहित्य समाजातील विविध समस्या भावना आणि विचारांना व्यक्त करते तसेच सामाजिक बदलांना प्रोत्साहन करते. समाजातील विविध जीवनशैली, संस्कृती, परंपरा ,रुढी दर्शविते. साहित्यातून विविध विचार तत्त्वज्ञान आणि मूल्यांना व्यक्त करते. त्यामुळे समाजातील लोकांना नवीन विचारसरणी व दृष्टिकोन प्राप्त होतो.
राष्ट्रीय परिषदेच्या प्रथम सत्रात मार्गदर्शन करताना प्रोफेसर डॉ. डी.बी. मासाळ म्हणाले,' मानवी मूल्यामुळे मानवी संबंध सुधारतात मानवी मूल्ये म्हणजे प्रेम, सत्य ,योग्य आचरण, शांती आणि अहिंसा होय. या मूल्यामुळेच मानवी संबंध सुधारतात आणि समाजाला एकत्र येण्यास मदत करतात . विविध कालखंडातील मानवांचा मानवी मूल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन कशाप्रकारे होता याविषयीची माहिती सांगत असताना जैन ,बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान ,प्राचीन महाकाव्याच्या आधारे व महात्मा गांधीजींच्या विचारातून सत्य अहिंसा या मानवी मूल्यांवर विस्तृतपणे चर्चा केली. तसेच राष्ट्रीय परिषदेच्या द्वितीय सत्रात डॉ.विजय निकम म्हणाले, परकीय देशातून येणाऱ्या मालावर अतिरिक्त आयात शुल्क या विषयीची माहिती दिली.
तसेच टेरिफ वाॅर म्हणजे दोन देशांमध्ये होणारे व्यापार युद्ध होय. एका देशाने दुसऱ्या देशाकडून आयात होणाऱ्या मालावर कर (टेरिफ )वाढवून व्यापार कमी करण्याचा प्रयत्न करतात .याचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो. याविषयी माहिती सांगत असताना व्यापारात आयात, निर्यातीचे महत्त्व, त्याचबरोबर अमेरिकीच्या अर्थव्यवस्थेविषयीच्या माहिती बाबत विस्तृतपणे चर्चा केली. परिषदेच्या अध्यक्षीय भाषणांमधून प्रोफेसर डॉ. शिवाजीराव पाटील यांनी भारतीय राज्यघटनेची माहिती सांगितली आणि लोकशाहीचे महत्त्व विशद करतानाच राज्यघटनेतील मूलभूत अधिकार याविषयीची माहिती दिली. तसेच स विविध सामाजिक चळवळीची माहिती सांगून वर्तमान काळातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. सूत्रसंचालन प्रा. एस .आर. धोंगडे व प्रा. एम. एन आवळे यांनी केले. आभार प्रा.के.जी. कुंभार यांनी मानले.
Social Plugin