प्रतिनिधी--संजय भरदुक मंपिर
मंगरूळपिर-- दिनांक २६ एप्रिल ला नागपूर येथे एस एन एम ॲग्रो टेक कंपनी तर्फे प्रथम डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रम ला सुरूवात झाली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले राज्यमंत्री श्री जयस्वाल साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली खासदार श्री आष्टीकर साहेब तसेच कंपनीचे एमडी श्री सतीशजी मोहोड साहेब यांनी दिपप्रज्वलन करून कार्यक्रम ला उपस्थित होते.
तर मंगरूळपिर तालुक्यातील चांभई येथील उत्कृष्ट शेतकरी म्हणून श्री दिलीप भाऊ फुके यांनी आपल्या शेतात मध्ये पिकांमध्ये व जमिनीमध्ये बीजप्रक्रिया करण्यासाठी कंपनीचे मायक्रोरिझा हे घटक वापरले व त्याचा रिझल्ट घेतला असता असे दिसून आले की चांगल्याप्रकारे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल व बुरशीनाशक म्हणून पिकांमध्ये काम करेल यांचा सखोल अभ्यास केल्यामुळे त्यांना उत्कृष्ट शेतकरी अवार्ड देण्यात आला .या कार्यक्रमाला राज्यमंत्री श्री जयस्वाल साहेब, हिंगोली चे खासदार श्री आष्टीकर साहेब, तसेच एस एन एम ॲग्रो टेक चे एमडी श्री सतीश मोहोड साहेब,एम आय डी सी अकोला चे व्यवस्थापक श्री सोळंके साहेब, श्री जगताप साहेब यांच्या हस्ते देण्यात आला व सर्व कंपनी अधिकारी वर्ग व शेतकरी उपस्थित होते.
Social Plugin