गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
दि २७/४/२५ सकाळी साडेपाचच्या सुमारास प्राप्त माहितीनुसार कारंजा मूर्तिजापूर रोडवर खेर्डा फाट्याजवळ रोहित खाडे नावाचा युवक पायदळी पेट्रोल पंप कडे जात असताना अज्ञात वाहनाने जबरदस्त दिल्याने युवक गंभीर रित्या जखमी झाला व त्याच्या पायाला व डोक्याला जबर मार लागला अपघाताची माहिती श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी 108 लोकेशन कामरगाव पायलट नंदकिशोर आरेकर व डॉक्टर राहुल इंगळे यांना देताच ते तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन जखमी झालेल्या रुग्णाला कारंजा उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले जखमी रुग्णाचे नाव रोहित खाडे व 22 राहणार खेर्डा असे असून हॉस्पिटल येथे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासले असता त्याला मृत घोषित केले. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे.
Social Plugin