अतनूर / प्रतिनिधी
पंचकोषीत प्रसिध्द असलेल्या जळकोट तालुक्यातील अतनूर येथील संजीवन समाधी श्री.घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या १४९ व्या संजीवन समाधी सोहळा निमित्त प्रतिवर्षोप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व याञोत्सव दि.२८ एप्रिल ते ५ मे पर्यंत आयोजित केला आहे.
या सप्ताहात सकाळी ६ ते ७ श्री.घाळेप्पा स्वामी यांचा रूद्राभिषेक, ७ ते १० श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथ्यावरील भजन, २ ते ५ भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, राञी ९ ते ११ हरिकिर्तन, राञी १२ ते ४ हरिजागर, पहाटे ४ ते ६ काकडा आरती आदी कार्यक्रम सुरू राहणार आहेत.
सप्ताहात सोमवारी दि.२८ रोजी ह.भ.प.संतोष महाराज अतनुरकर, दि.२९ मंगळवारी हे.भ.प. कांचनताई शिवानंद शेळके आमदापुर, दि.३० बुधवार ह.भ.प.शेख शौकत महाराज उमरगेकर, दि.१ में. गुरुवार ह.भ.प.राऊतताई राऊत लातूरकर, शुक्रवार दि.२ में रोजी ह.भ.प.संतोष पुरी महाराज चोळाखेकर, दि.३ शनिवार ह.भ.प.प्रकाश महाराज साठे बिडकर, दि.४ रविवार दुपारी ह.भ.प.विश्वनाथ महाराज यांचे गुलालाचे कीर्तन, तर रात्री ह.भ.प.नागेश्वरी ताई झाडे आळंदीकर यांचे किर्तन होणार आहे. दि.५ सोमवार ह.भ.प.श्री.नवनाथ महाराज गोसावी डोंगरशेळकीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तसेच अतनूर, चिंचोली, गव्हाण, गुत्ती, वडगाव, कोदळी, देऊळवाडी, हातराळ, दापका ( गुंडोपंत ), कोळनूर, डोरनाळी, वळंग, हिप्पळनारी, मरसांगवी आदी गावातील टाळकरी, भजनी मंडळी, भक्तगण, श्रोते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.
या सप्ताहात दि.४ मे रोजी सार्वजनिक जागर व भारूडाचा दणदणीत कार्यक्रम होणार आहे. याचदिवशी भंडारा ( महाप्रसाद) आजूबाजूच्या परिसरातील गावांसह अतनूर संपूर्ण गावाला गाव जेवणाचे आयोजन केले आहे. पहाटे गावाभोवती भव्य दिव्य पालखी सोहळा होतो. याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.काशि विश्वनाथ मठ संस्थान अतनूर व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.
Social Plugin