अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
मानव हक्क आयोग मुंबई कडे दाद मागितल्यानंतर अंबड ते रोहिलागड मुख्य रस्त्यावरील नांदी जवळचा आठशे मिटर वनीकरण विभागाने खुप वर्षापासून अडवुन ठेवलेला रस्ता आज पुर्ण करण्यासाठी परवानगी दिली असुन सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबड यांनी तो रस्ता तातडीने पुर्ण केला याबाबत ग्राहक संरक्षण परिषद चे अशासकीय सदस्य डॉ.रमेश तारगे यांनी आयोगाकडे लेखी तक्रार केली होती.या विषयी थोडक्यात माहिती अशी की अबंड ते रोहिलागड मार्गावर नांदी जवळ वनीकरण विभागाच्या ताब्यात जमीन आहे.सदरील जमीनी मधुन सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुख्य रस्ता गेलेला आहे तो रस्ता रूंदीकरण मध्ये दोन्ही बाजुने पूर्ण झाला होता व फक्त आठशे मिटर रस्ता वनीकरण विभागाच्या काही तांत्रिक अडचणीमुळे अपूर्ण राहिलेल्या रस्त्यावर नेहमी अपघात होत होते.
त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क साधुन माहिती घेतली असता वनीकरण सदरील रस्ता करु देत नाही असे उत्तर मिळायचे म्हणुन त्या संदर्भात अशासकीय सदस्य ग्राहक संरक्षण परिषद डॉ.रमेश तारगे यांनी मानव हक्क आयोग मुंबई यांच्याकडे एक वर्षापुर्वी नांदी ग्रामपंचायत चा ठराव घेऊन हा रस्ता पुर्ण करण्यात यावा यासाठी सविस्तर तक्रार केली होती.त्या तक्रारी वरुन जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला व वनीकरण विभागाला आपले म्हणे मांडण्यासाठी नोटीस काढुन बोलावण्यात आले होते.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डगुला आणि वनीकरण विभागातील अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर बैठका घेऊन अखेर तो रस्ता पुर्ण करण्यासाठी परवानगी घेऊन पुर्ण केला त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता डगुला यांचे नागरिकाकडून आभार मानण्यात येत आहेत.आणि मानव हक्क आयोगाचे सुद्धा अभिनंदन व कौतुक होत आहे.
Social Plugin