बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या काटेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीत शिकणाऱ्या संपदा प्रविण कोरडे हिने स्पर्धा परीक्षेमध्ये यशाचा चौकार मारला आहे. संपदा ही काटेवाडीच्या सरपंच शुभांगी कोरडे यांच्या सुकन्या आहेत . NSSE मध्ये 200पैकी 196 गुण मिळवत ती राज्यात 3 री आली असून BDS, मंथन आणि अभिरूप या परीक्षेतही ती अव्वल ठरली आहे. कोणत्याही प्रकारचा खाजगी क्लास न लावता स्वतःच्या हिमतीवर आणि शाळेतील शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाने हॆ यश तिने संपादन केलं आहे. खाजगी आणि इंग्रजी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळाही गुणवत्तेत कुठेही मागे नसल्याचं यातून सिद्ध होत आहे.
यासाठी तिला आई, वडील, शाळेतील शिक्षिका रबाना शेख, मुख्याध्यापक श्री प्रकाश पवार सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आहे.
तिच्या या यशाबद्दल डॉ प्रियाताई शिंदे , खटावच्या गटशिक्षणाधिकारी सौ. सोनाली विभुते , शिक्षण विस्तार अधिकारी संगिता गायकवाड , केंद्र प्रमुख अजित निकाळजे , बुधच्या सरपंच सुजाता बोराटे , उपसरपंच व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयसिंह राजेघाटगे , उपसरपंच वैभव कोरडे शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्रामस्थ, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केलं आहे.
Social Plugin