अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड नगर परिषदेला सन 2014-15 नुसार विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी जालना यांनी पैठण जालना पाणी पुरवठा योजनेमधुन 04 एमएलडी पाणी देण्याची मान्यता दिलेली आहे.या मान्यतेनुसारच अंबड शहराला पाणी मिळाले आहे.मात्र मागील काही काळापासुन सदरील योजनेतुन पाणी कपात करुन ती 03 एमएलडी इतकी करण्यात आली त्यामुळे शहरातील नागरिकांना सध्या 15 ते 20 दिवसांनी पाणी मिळत आहे.पाण्याअभावी शहरातील जनतेला भटकंती करावी लागत आहे.तसेच टँकरचे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. टँकरच्या पाण्यामुळे साथीचे आजार पसरत आहेत.नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहेत तेव्हा मंजुरी इतकेच 04 एमएलडी पाणी देण्यात यावे, अशी मागणी जालन्याचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांना शिवसेना उभाटा गटाच्या वतीने सुशिलकुमार (कुमार) रुपवते, उद्धव पिराणे,रमेश वराडे,दिपक खरात,रवी इंगळे,प्रकाश गायकवाड यांनी निवेदनातून मागणी केली आहे.
वरील मान्यतेप्रमाणे अंबड नगर परिषदेला 04 एमएलडी पाणी दिल्यास अंबड शहरात किमान 08 दिवसाला पाणी मिळणे शक्य होईल.तसेच जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही आणि टँकरच्या पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या रोगांची लागन होणार नाही.नगर परिषदेकडे थकीत असलेल्या जालना महापालेकेच्या पाणी पट्टी संदर्भात नगर परिषदेने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.शासनाने 06 कोटी रुपये मंजुरही केलेले आहेत.परंतु निधीच्या कमतरतेमुळे सदरील निधीस विलंब होत आहे.हा निधी मिळण्यासह आपण मदत करावी.
Social Plugin