Ticker

6/recent/ticker-posts

श्री सदाशिव बनकर सेवानिवृत्त



बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे ]  

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल तांत्रिक विभागातील निदेशक या पदावर कार्यरत असणारे श्री सदाशिव बनकर हे आपल्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.

 शाळेच्या वतीने आज त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी प्रा. जे. बी. जाधव, प्राचार्य श्री डी.एन.गोपने, पर्यवेक्षक श्री आर.एन. जाधव,श्री मोहनराव गुरव, सौ. लावंड देवयानी, सौ आरती माळी, श्री डी. व्ही. देशमुख, श्री यशवंत घुगरे, डॉ.संदीप माळी, श्री डुबल यांनी मनोगते व्यक्त केली.श्री व सौ बनकर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सौ माधुरी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले प्रा.श्री शंकरराव चव्हाण यांनी आभार मानले.कार्यक्रमास श्री बनकर यांचे कुटुंबीय, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.