Ticker

6/recent/ticker-posts

सातारा जेलमधील महिला बंदयांसाठी "महिला सक्षम, क्षमता वृद्धिंगत व मनःशांती शिबिराचे प्रमाणपत्र वाटप”



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

ध्यास फाउंडेशन, सातारा व सातारा जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “महिला सक्षम व क्षमता वृद्धिंगत” कार्यक्रम अंतर्गत “मनःशांती शिबिराची” सांगता प्रमुख पाहुण्या कीर्ती साळुंखे,   सातारा जिल्हा कारागृह अधिक्षक शामकांत शेडगे ,  वरीष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे , कार्यशाळेच्या मार्गदर्शक सौ. त्रिवेणी थोरात व ध्यास फाउंडेशनच्या अध्यक्षा वैजयंती ओतारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

5 दिवसाच्या कार्यशाळेत प्राणायामाचे सोबतच “मंडला थेरपी”च्या सहाय्याने मन एकाग्र करण्याचे तंत्रज्ञान या कार्यशाळेत शिकवण्यात आले. ध्यास फाउंडेशनच्या माध्यमातून योगा कोर्स देखील घेण्यात आला.  ज्यामध्ये सूर्यनमस्काराबरोबरच प्राणायाम व आर्ट ऑफ लिविंगचा महिलांसाठी असलेल्या “पवित्रा कोर्स” घेण्यात आला.  कारागृहातील सर्व महिला बंदयांना या शिबिराचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

“ट्रॉमा हिलींग मंडला थेरपी‌” ही अतिशय प्रभावशाली टेक्निक आहे, असं मत त्रिवेणी थोरात यांनी मांडले.

कार्यक्रमाच्य प्रमुख पाहुण्या सौ. कीर्ती साळुंखे यांनी महिलांना मार्गदर्शन करत असताना महिलांनी स्वतःच्या  क्षमता ओळखून कारागृहातील वेळ सत्कारणी लावावा, तसेच महिला बंदयांनी कारागृहात उत्पादित केलेल्या वस्तूंना  बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

सदर कार्यक्रमास  कीर्ती साळुंखे, त्रिवेणी थोरात, .वैजयंती ओतारी, श्री शामकांत शेडगे कारागृह अधीक्षक,  श्री ज्ञानेश्वर दुबे वरिष्ठ तुरुंग अधिकारी, महिला शिपाई लता काळकुटे, ज्योती शिंगरे, रेश्मा गायकवाड, रूपाली नलवडे, श्री मानसिंग बागल सुभेदार, दारकु पारधी हवालदार, वाघेश्वर गरुड हवालदार, दिलीप बोडरे हवालदार, शिपाई प्रशांत कदम, रणजीत बर्गे, चेतन शहाणे, संदीप बोराटे ज्ञानेश्वर गायकवाड, तुकाराम घुटुकडे, बालाजी मुंडे, तानाजी बुडगे संदीप भांगरे इत्यादी उपस्थित होते.