Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. अरुणाताई बर्गे यांच्यामुळे कोरेगावात गरीबाची वाचली दृष्टी ज्योत...

छायाचित्र .- संविधान उद्देशिका डॉक्टर अरुणाताई बर्गे यांना देताना सामाजिक कार्यकर्ते उबाळे व कुटुंबीय (छाया-- प्रकाश राजेघाटगे )



बुध  दि: [प्रकाश राजेघाटगे ]

  सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून कार्यरत राहिले पाहिजे असा संदेश देणाऱ्या कोरेगाव मतदार संघातील डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्या प्रयत्नामुळे व सामाजिक कार्यकर्ते रमेश अनिल उबाळे यांच्या सहकार्याने एका गरीब महिलेची दृष्टी ज्योत पुन्हा तेवत ठेवण्यात यश मिळाले. यामुळे अनेकांनी डॉक्टर अरुणाताई बर्गे यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.  याबाबत माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील शिरढोण येथील बौद्ध वस्तीतील गरीब महिला सौ. सविता चंद्रकांत खंडाईत नेहमीप्रमाणे आपल्या उपजीविकेसाठी शेतात मजुरीसाठी  गेल्या होत्या. भांगलन  काम करत असतानाच अचानक त्यांच्या एका डोळ्यावर दगडी खडा उडला.  त्यामुळे त्यांच्या डोळ्याला जखम झाली. डोळा जाण्याची भीती वाटल्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी उपचार केले. त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश अनिल उबाळे यांना भेटा. असा अनुभवी व्यक्तीने सल्ला दिला. त्यानुसार सौ खंडाईत यांनी श्री उबाळे यांची भेट घेऊन त्यांना आपली व्यथा व गरिबीची जाणीव करून दिली. 

   डोळ्याला जखम झाल्यामुळे त्यांना सातत्याने डोकेदुखीचाही त्रास सहन करावा लागत होता. काही वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी त्यांना डोळ्यावर उपचार करण्यासाठी तातडीने पुण्याच्या मोठ्या डॉक्टरला दाखवा असा सल्ला दिला होता.  अखेर श्री रमेश उबाळे यांच्या सहकार्याने सातारा जिल्ह्यातील नामावंत नेत्रतज्ञ व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या बहीण डॉ. अरुणाताई बर्गे यांच्या दवाखान्यात  घेऊन गेले . त्यांनी सर्व तपासणी अहवाल आणि रुग्णाच्या गरिबीची जाणीव ठेवून मोफत औषध करण्याचा निर्णय घेतला .त्यामध्ये त्यांना यश आले. एका गरीबाचे डोळे वाचल्यामुळे श्री रमेश उबाळे यांच्याही डोळ्यातून आनंद अश्रू वाहिले. डॉक्टर बर्गे ताईंनी केलेल्या कार्यामुळे त्यांनाही माणुसकी जपण्यास बळ मिळाले. 

     डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्या या माणुसकीच्या कामगिरीबद्दल त्यांना संविधान उद्देशिका देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पुण्याचे आयजी कार्यालयाच्या स्वीय सहाय्यक सौ. तृप्ती रमेश उबाळे, ऋग्वेद उबाळे व रमेश उबाळे उपस्थित होते.