Ticker

6/recent/ticker-posts

जि.प.शाळा अकोला ठाकरे येथे इयत्ता ८वी च्या विद्यार्थ्यांना निरोप



साहेबराव अंभोरे @ग्रामीण प्रतिनिधी 

       जि.प.शाळा,अकोला ठाकरे येथे इयत्ता ८वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक गजानन केळे, विश्वनाथ पायघन, संजय अंभोरे , ज्ञानेश्वर गायकवाड ,रेखा कोल्हे,अनुपमा मोरे,पांढरे मामा तसेच शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

        निरोप समारंभाचे आयोजन शिक्षकांच्या मार्गदर्शनात इयत्ता ७वी च्या विद्यार्थ्यांनी केले होते . इयत्ता ८वी च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व शाळेतील अनुभव व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वैष्णवी चव्हाण हिने तर आभारप्रदर्शन विशाल गव्हाणे याने केले.