पुसेगाव दि .[प्रतिनिधी ]
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारवडी ता . खटाव येथे मार्गदर्शनपर भेट दिली.
या भेटीत त्यांनी शाळेत चालणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. शाळेची पटसंख्या, विद्यार्थ्यांची FLN मधील स्तरनिहाय संपादणूक, इयत्ता ५वी शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता ४थी प्रज्ञाशोध परीक्षा यांचा आढावा घेतला. स्पर्धा परीक्षांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रविष्ठ करण्याबाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या. अध्यापनात तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्व विशद केले. लोकसहभागातून तयार केलेल्या संगणक कक्षाची व CCTV यंत्रणेची पाहणी केली. जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेतील यशाबद्दल, लोकमत ऊर्जा यांचेकडून राबवलेल्या पर्यावरण पूरक उपक्रमातील यशाबद्दल सर्व विद्यार्थी पालक , ग्रामस्थ, शिक्षक यांचे कौतुक केले. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील यशाबद्दल उपशिक्षिका दिपाली जाधव यांचे अभिनंदन केले. शालेय परसबागेची प्रत्यक्ष पाहणी केली. माळरानावर फुलवलेल्या परसबागेचे कौतुक केले. शाळेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरुण आवळे व श्री. सुनिल जगदाळे यांचे जिल्हाधिकारीसाहेबांकडून अभिनंदन करण्यात आले.
शाळेच्या एकंदरीत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी डॉ.प्रियाताई शिंदे ,श्री भरत मुळे , नवनिर्वाचित सरपंच सौ. कमल कदम ,भाजपा तालुकाध्यक्ष श्री शिवाजी शेडगे , जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे मित्र गारवडी गावचे सुपुत्र श्री संभाजी शेडगे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादा पवार ,शिक्षण प्रेमी पोपट आप्पा बिटले ,विविध अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
Social Plugin