प्रतिनिधी. शेख इमरान
सुलतानपूर :(तालुका लोणार) येथील डॉ. आर. एन. लाहोटी सी.बी.एस.ई. स्कूल या नामवंत शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५वी) २०२५ मध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे. या परीक्षेस केवळ तीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि विशेष अभिमानाची बाब म्हणजे सर्व तिघांनी यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन शाळेचा गौरव वाढविला आहे. प्रथम क्रमांक : सार्थक मनोहर धांडे द्वितीय क्रमांक : योगिराज गिरीश मखमले व तृतीय क्रमांक : प्रशिक राजेश गवई, विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांच्या अथक परिश्रमासोबतच शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन आणि पालकांचा मोलाचा सहभागही आहे.
शाळेचे अध्यक्ष डॉ. हेमराजजी लाहोटी, उपाध्यक्ष डॉ.ज्योती शशिराज लाहोटी मॅम व प्राध्यापक, शेख राशीद सर तसेच सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Social Plugin