Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद माळकिणी शाळेचा सोहम जाधव शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र



कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी 

मंठा :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा २५ एप्रिल रोजी जाहीर झाला. यामध्ये मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळकिणी या शाळेतील सोहम सुनील जाधव हा विद्यार्थी पात्र ठरला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाने माळकिणी शाळेची आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

  शाळेचे मुख्याध्यापक भगवान जायभाये,गजानन निर्वळ, ज्ञानेश्वर राठोड या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी विपुल भागवत,शिक्षण विस्ताराधिकारी काशिनाथ राठोड, केंद्रप्रमुख शिवाजी देशमुख तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थी सोहम सुनील जाधव यांचे अभिनंदन केले.