बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने गोरगरीब वधू-वरांच्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे २० मे रोजी आयोजन केल्याची माहिती मठाधिपती सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली. श्री सेवागिरी महाराज मंदिरात मंगळवारी (ता. २०) दुपारी दोन वाजून ४४ मिनिटांनी ही जोडपी विवाहबद्ध होतील. या सोहळ्याचा सर्व खर्च देवस्थान ट्रस्ट करत असल्याने वधू-वरांच्या पालकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. वधू-वराचा पोशाख, संसारोपयोगी साहित्य, वऱ्हाडी मंडळास भोजन, फोटो आदी खर्च ट्रस्ट करणार आहे. गरजू उपवर-वधूंनी नोंदणी करण्याचे आवाहन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांनी केले आहे.
Social Plugin