Ticker

6/recent/ticker-posts

श्रीरामतांडा जि.प शाळेतील सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र



कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी 

मंठा :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा 25 एप्रिल रोजी जाहीर झाला. यामध्ये मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीरामतांडा या शाळेतील सहा विद्यार्थी पात्र ठरले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाने श्रीरामतांडा शाळेने परत एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

                 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीरामतांडा या शाळेने 2024- 25 या शैक्षणिक वर्षात नवोदय प्रवेश परीक्षा ,जिल्हास्तरीय महादीप परीक्षा (हवाई सहल निवड चाचणी) जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषास्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा यामध्ये या अगोदर उल्लेखनीय व दैदीप्यमान यश संपादन केले आहे. त्याप्रमाणे नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात आरव सरकटे (236गुण), स्वराज निर्वळ (220गुण), शिवम राठोड (210गुण),तेजस्विनी अंबुरे (164गुण),अनुष्का जाधव (158 गुण) व अंकिता टकले (158) गुण घेऊन पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे केंधळी परीक्षा केंद्रात सदर विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळविले आहेत.

            शाळेचे मुख्याध्यापक व इयत्ता पाचवी वर्गाचे वर्गशिक्षक श्री अविनाश लोमटे यांनी वर्षभर शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेचे ज्यादा तयारी वर्ग घेऊन सराव परीक्षांची शृंखला आयोजित केली तसेच शाळेतील शिक्षक श्रीकांत अंबुरे, सुनीता दुभळकर, अर्चना लांडगे व पूजा नागटिळक यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.या यशाबद्दल शिक्षणाधिकारी मा.कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी श्याम देशमुख, गटशिक्षणाधिकारी विपुल भागवत, उपशिक्षणाधिकारी सुभाष भालेराव, शिक्षण विस्ताराधिकारी के.जी राठोड,म. रा. शिक्षक परिषद मराठवाडा विभागीय अध्यक्ष भगवान जायभाये, अर्जुन पवार,केंद्रप्रमुख रामेश्वर शिंदे,केंद्रीय मुख्याध्यापक विलास माथने यांनी यशस्वी विद्यार्थी व मुख्याध्यापक अविनाश लोमटे व सर्व शिक्षक यांचे अभिनंदन केले.