Ticker

6/recent/ticker-posts

सुशीत ३८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्साहात समारोप



तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई 

       गेवराई तालुक्यातील सुशी (व) येथे ३८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा श्रीक्षेत्र नारायण गडाचे महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप झाला. याप्रसंगी महंत शिवाजी महाराज व श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत दत्ता महाराज गिरी यांची रथातून भव्य मिरवणूक काढून फुलांची उधळण करत स्वागत दिंडी काढण्यात आली यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण होवून गोकुळ अवतरल्याची अनुभूती आली. यावेळी पंचक्रोशीतील महिला व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती 

          स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा श्री नगद नारायण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सुशी (व) येथे वै.महादेव महाराज यांच्या आशीर्वादाने प्रारंभ झालेल्या ३८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची रविवार दि.२७ एप्रिल रोजी महंत शिवाजी महाराज यांच्या अमृततुल्य काल्याचे कीर्तनाने भक्तिमय वातावरणात समारोप होवून सांगता झाली. यावेळी ह.भ.प.दत्ता महाराज गिरी, विशाल महाराज कारंडे, डिंगाबर देवा कुलकर्णी , ह.भ.प.गणपत महाराज उबाळे, विनायक उबाळे, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच टाळकरी, वारकरी, मृदंगाचार्य, गायणाचार्य भालदार, चोपदार , विणेकरी व सुशी पंचक्रोशीतील महिला व पुरुष भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कीर्तनानंतर श्रीधर एकनाथ पौळ, मच्छिंद्र वाघूजी पौळ यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच सुशी येथील तरुण मंडळी व सप्ताह कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


श्रीक्षेत्र नारायणगड चा २०३८ चा नारळी सप्ताह करण्याचा सुशीकरांचा निर्धार 


     सुशी (व) येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाचे नारळ द्यावे अशी मागणी महंत शिवाजी बाबांकडे ग्रामस्थांनी केली या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संत कुलभूषण महात्मा श्री नगद नारायण महाराज यांच्या कृपेने सुशी येथे २०३८ वा नारळी सप्ताह करण्याचा शब्द गडाचे महंत शिवाजी बाबांकडून देण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी शिवाजी बाबांचे आभार व्यक्त करुन  २०३८ चा भव्य नारळी सप्ताह मोठ्या थाटामाटात करण्याचा एकमुखी निर्धार केला.