गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
दि 26/4/25 सूत्रानुसार सकाळी 6 सुमारास फोरचुनर गाडीने मित्रपरिवार शनिशिंगणापूर ते दर्शनासाठी जात असताना सकाळी चालत्या ट्रकला मागून धडक फोरचुनर कार ने धडक दिल्याने त्यामधील एकाचा जागीच मृत्यू तर दोन जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग लोकेशन 108 रुग्णवाहिका पायलट मनवर डॉक्टर गणेश तसेच 108 लोकेशन रुग्णवाहिका शेलुबाजार हायवे पोलीस अग्निशामक दल समृद्धी महामार्ग व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. व जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकारी श्रीजीत राऊत वय 25 यांना मृत घोषित केले. व दोन रुग्णांवर प्रथमोपचार करून करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले. जखमी रुग्णांची नाव रोहित अजित पेठे वय 23 वर्ष आणि श्रवण सिद्धेश्वर पेठे वय 23 वर्ष अशी आहेत. पुढील तपास कारंजा शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
त्यावेळी मधील साठी समृद्धी रुग्णवाहिकाचे अजय घोडेस्वार कक्षसेवक नितीन जाधव विनोद खोंड हे प्रामुख्याने उपस्थित होते .
Social Plugin