अतनूर / प्रतिनिधी
भारत हे निधर्मी नव्हे; तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. येथे प्रत्येकाला आपल्या धर्माचे आचरण आणि प्रचार-प्रसाराचे संविधानाने स्वातंत्र्य दिले असून वैविध्याला अधिकृत केले आहे...वैविध्याने देश सजवला आहे ! आपल्या देशातील विविध धर्मियांचे धर्मग्रंथ त्या त्या धर्माच्या way of life चा दस्तऐवज असेल तर; भारतीय संविधान हे way of nation building चा...समताधिष्ठित भारतनिर्माणाचा roadmap होय...milestone होय !! राष्ट्रउभारणीसाठी सांसदीय लोकशाहीचा स्वीकार करत आपण कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि त्यांच्यावर watchdog च्या भूमिकेत न्याय मंडळ निर्माण केले आहे. यांना आपण pillars of the democracy म्हणतो. परंतु सर्वोच्च कोण ? सर्वोच्च न्यायालय की संसद, यावर आपल्या देशात कायम खल केला जातो. वास्तविक संविधानाला विचारल्याशिवाय ह्या दोन्ही यंत्रणांना एक पाऊलही पुढे टाकता येत नाही. संविधानाच्या संदर्भाशिवाय त्यांना शब्दच फूटू शकत नाहीत आणि म्हणूनच संविधानाला देशाचा धर्मग्रंथ आणि लोकशाहीचा सरताज म्हटले जाते. असे प्रतिपादन ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी व्यक्त केले.
२६ नोव्हेंबर मंगळवार रोजी अमृतमहोत्सवी संविधान दिनानिमित्त जिजामाता प्राथमिक शाळा व तुकाराम नाईक प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात येऊन संविधान तज्ञ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून संविधान दिनाचे महत्त्व सांगताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थापक अध्यक्ष तथा संस्था सचिव चव्हाण, मुख्याध्यापक संग्राम बंधू पवार, मुख्याध्यापक नवनाथ कसबे, मुख्याध्यापक डी.एन.कुंटे, केंद्रे सर, शिंदे सर, कांबळे सर, नाईक सर, चव्हाण सर, राठोड सर, अंकुशे सर, गायकवाड सर, महालिंगे सर, पाटील सर, देवकत्ते सर, चव्हाण सर, राठोड सर, पवार सर, गायकवाड सर, कांबळे सर, शिंदे सर, अतनूर येथील जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूरचे प्रदेशअध्यक्ष संजय शिंदे, उबाठा शिवसेनेचे जळकोट तालुकाध्यक्ष मुक्तेश्वर पाटील, गव्हाणचे सरपंच बालाजी गुडसुरे, चिंचोलीचे सरपंच सौ.रेखा बिरादार, माजी सरपंच संतोष निवृत्ती बट्टेवाड, मेवापुरच्या सरपंच सौ.कोमल तुळशीदास पाटील, तुळशीदास पाटील, अमोल गायकवाड, गुत्तीच्या सरपंच सौ.मीनाताई यादवराव केंद्रे, ग्रामपंचायत सदस्य तथा युवा नेते यादवराव विनायकराव केंद्रे, शंकुतला बाबर, पत्रकार बाळासाहेब शिंदे, शिवसेनेचे जिल्हा सरचिटणीस विकास सोमुसे- पाटील, कैलास सोमुसे-पाटील, सुदाम बाबर, श्रीकांत बोडेवार, राजकुमार कापडे, सौ.संध्या शिंदे, आदिजण उपस्थित होते.
Social Plugin