अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड येथील मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या मत्स्योदरी मातेच्या मंदिर व परिसरातील नेत्रदीपक दीपोत्सव दर वर्षी प्रमाणे याही वर्षी शुक्रवार (दि.१५) रोजी सायंकाळी ५.३० वाजता अकरा हजार तेलाचे दिवे,विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतिषबाजीने उजळून निघाले,
अंबड येथील मत्स्योदरी देवीचा दीपोत्सव गेल्या २१ वर्षांपासून दरवर्षी साजरा केला जात असून मत्स्योदरी दीपोत्सव मंडळ व सर्व अंबड शहर परिसरातील भाविक भक्तांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो.यासाठी बालक,युवक व ज्येष्ठ नागरिक आपापली सेवा तत्परतेने देण्यासाठी पुढाकार घेतात.हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविक भक्ताची मोठी गर्दी झाली.यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार विजय चव्हान,भावी आमदार बबलू सेठ चौधरी,भागवतराव कटारे,देवीसंस्था व्यवस्थापक कैलास शिदे,सुनील शेठ चौधरी,दिपक ठाकुर,विठ्ठल सिंग राणा,बाबुराव खरात,लक्ष्मीकांत देशमुख,यदुनाथ जपे,चंद्रकांत देशपांडे,विनायक कुलकर्णी,ज्ञानेश देशमुख,हेमंत कुलकर्णी,विनोद सर्जे,राजेंद्र देशपांडे,रवींद्र कुलकर्णी,ज्योती ठाकुर,उषा ताई,नंदाताई बुंदेलखंडे,वनिता ठाकुर,प्रियंका ताई खरात, सावित्री बाई गुढे,गंगासागर पिंगळे आदी भावीक भक्त उपस्थित होते.
Social Plugin