Ticker

6/recent/ticker-posts

आंबेगव्हाणला क्रांतीसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी



शुक्रवार दिनांक 15- 11- 2024 रोजी आंबेगव्हाण, तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये  क्रांतीसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडाची मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली यावेळी आंबेगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अनिता डोके,पेसा समिती अध्यक्ष श्री विलास मेंगाळ, वन हक्क समिती अध्यक्ष श्री अशोक डोके, तंटामुक्ती चे अध्यक्ष श्री संतोष मेंगाळ,  उपसरपंच श्री राजेंद्र गायकर ,सौ  सत्यभामा दराडे, युवा उद्योजक श्री संतोष डोके, ग्रामपंचायत कर्मचारी रोहिदास सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य श्री ज्ञानेश्वर कडाळी ,सामाजिक कार्यकर्ते रोहिदास डोके ,आंबेगव्हाण व कमलानगरचे शेकडो ग्रामस्थ या जयंतीनिमित्त उपस्थित होते .

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या धरतीवरील जल, जंगल, जमिनीचे रक्षण करणारे  क्रांतीसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त- भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, राया ठाकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे ग्रामस्थांनी पूजन करून  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .

क्रांतीसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडाच्या जयंती निमित्त सभेच्या अध्यक्षस्थानी आंबेगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अनिता डोके होत्या  यावेळी आंबेगव्हाण ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष- श्री संतोष मेंगाळ यांनी सांगितले की भारतदेश पारतंत्र्यातच्या जोखडत असताना देश स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची बाजी लावत होते. यामध्ये आदिवासी क्रांतिकारांनी आपले हक्काचे जल, जंगल व  जमिनीसाठी प्राणाची परवा केली नाही .भारतभर हजारो आदिवासी क्रांतीकारक स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. या क्रांतीकारापैकी भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे व राया ठाकर ही अग्रेसर होती .

आदिवासींच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि ब्रिटिशांविरोधात उलगुलान आंदोलन करणारे क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक लोकनायक बिरसा मुंडा यांची 15 नोव्हेंबर रोजी जयंती आपण साजरी करत आहोत. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875साली एका शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांचे नाव सुगनापुर्ती असे होते तर आईचे नाव करमीपुर्ती असे होते.

बिरसा मुंडा यांनी 1899 सली इंग्रजांच्या विरोधामध्ये गुलगुलान म्हणजे सशस्त्र आंदोलन सुरू केले. त्यांनी ब्रिटिश जमीनदार, ख्रिश्चन मिशनरी, वसाहत वाल्यांवर हल्ले केले .ब्रिटिशांची शासन व्यवस्था मोडीत काढून स्वतः जमीनदार पद्धत, महसूल गोळा करणे, ब्रिटिशांचा ग्रामीण भागाचा ताबा घेणे व महसूल गोळा करणे असे स्वतःचे शासन सुरू केले.