प्रतिनिधी रणजीत तायडे
ज्ञानेश्वर सुलताने या तरुणाला सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जान असून गौरगरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला धावून जातो.ओबीसी, अल्पसंख्याक, दलित, महिला, तरुण यांच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन बहुजनांची माई प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी केले.वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने* यांच्या प्रचारार्थ चोहोट्टा बाजार येथे विशाल सभा घेण्यात आली. या सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जेष्ठ नेत्या शोभा शेळके, मनोहर शेळके, दामोदर जगताप, शंकरराव इंगळे, सुरेश पाटकर, प्रभा शिरसाठ, अॅड. नरेंद्र बेलसरे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, रोशन पुंडकर, युवराज मुरकुटे, पवन बुटे, योगेश वडाळ, रमेश तरोळे, गजानन दोड, काशीराम साबळे, गणेश खोडके, प्रकाश राणे, राजीव एखे, सुरेंद्र ओइंबे, गजानन मालठाणे, गजानन दामोदर, ज्ञानेश्वर जाधव, विनोद नांदुरकर, निळू बचे, नीलेश किर्तक, मनोहर बनसोड आदींची उपस्थिती होती.
या विशाल सभेला मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी परिवर्तनाची हाक दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गॅस सिलेंडर या निशाणी समोरील बटन दाबून ज्ञानेश्वर सुलताने यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
Social Plugin