Ticker

6/recent/ticker-posts

निष्ठावंत" सलग चौथ्या पराभवासाठी "सज्ज"


  बुध  दि .[ प्रकाश राजेघाटगे ]  

 लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. पण सातत्याने 'पराभव' पदरी पडत असताना पण निवडणूक लढवण्याचा 'अट्टाहास' काहीजण करत असतात. प्रत्येक निवडणुकीत 'मीच' म्हणत निवडणुक लढवतात. पराभवाची हॅटट्रिक झाल्यानंतर पण चौथ्या पराभवाकडे झेपावत असलेले एक 'उमेदवार' नेहमीप्रमाणे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात उभे आहेत. या मतदार संघात आ. महेश शिंदे यांचे 'तुफान' घोंगावत असताना 'निष्ठावंत' सलग चौथ्या पराभवासाठी 'सज्ज' झाले असल्याचे दिसते. 

         गत विधानसभा निवडणुकीत आ. महेश शिंदे यांनी दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे ते महाराष्ट्रात जायंट किलर ठरले होते. आ. महेश शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला होता. पण पराभव पदरात पडला तरी निवडणुक लढवण्याची 'हौस' असलेले थांबले नाहीत. मग जिल्हा बॅंक निवडणुकीत 'आपटी' खाल्ली. मग सातारा लोकसभा लढवली. पण 'राजें'नी धोबीपछाड दिला. आ. महेश शिंदे यांनी 'कोरेगाव' मधून महाराजांना लिड दिले. गत विधानसभा, जिल्हा बॅंक अन् लोकसभा या निवडणुकीत पराभवाची हॅटट्रिक झाली. निकाल लागण्या अगोदरच 'गुलाल' उधळणारे पुन्हा एकदा एकदा 'निष्ठावंत' म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

         महेश शिंदे यांनी 'आमदार' होताच कोरेगाव मतदारसंघ पिंजून काढत विकासात्मक कामांना सुरुवात केली. कोरोना काळात हजारों कोवीड रुग्णांना जिवदान दिले. आ. महेश शिंदे यांचा आवाका मोठा असल्याने त्यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे 'उपाध्यक्ष' पद देण्यात आले. 'नामदार' झाल्यावर आ. महेश शिंदे यांनी अनेक गावातील पाणंद रस्ते केले. मतदार संघातील प्रत्येक गावात काॅंक्रीट रस्ते केले. अनेक सिंचन योजना पूर्ण केल्या. पेय्य जल योजना मार्गी लावल्या, समाज मंदिरे, संरक्षण भिंती उभ्या केल्या. कोरेगाव मतदारसंघातील वाड्या-वस्त्यांवर विकास कामे केली. अवघ्या पाच वर्षांत कोरेगावचा कायापालट केला. विधानसभा मतदारसंघाची 'राजधानी' आयडाॅल बनवली. 

           कोरेगाव मध्ये 'जनसागर' लोटला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, माझा महेश चौकार-षटकार ठोकत शतक झळकावणार असे सांगत निवडणुकी नंतर महेश 'मंत्री' होईल अशी ग्वाही दिली. 

       कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आलेलं भगवं 'तुफान' अन् उठलेले मोहोळ पाहता आ. महेश शिंदे पुन्हा एकदा निश्चितपणे 'आमदार' होणार आहेत. तर पराभवाची सवय झालेले 'निष्ठावंत' सलग 'चौथ्या' पराभवासाठी सज्ज झाले आहेत.