बुध दि[प्रकाश राजेघाटगे ]
दुष्काळातच माझा जन्म झाला आहे. त्यामुळे मी दुष्काळाचे चटके अनुभवले आहेत. त्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सिंचन योजना राबविण्यासाठी प्राधान्यक्रम दिला आहे. भविष्यात संपूर्ण कोरेगाव मतदारसंघ 'पाणीदार' करण्यासाठी 'तिहेरी' सिंचन योजना आणणार असल्याची ग्वाही आ. महेश शिंदे यांनी दिली. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदारांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.
आ. महेश शिंदे म्हणाले, खटाव तालुका कायम दुष्काळी होता. त्यामुळे दुष्काळाचे चटके सोसले आहेत. त्यामुळेच माझा राजकीय जन्म झाला. कोरेगाव तालुका सिंचनापासून वंचित होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यामुळे नेर तलावात पाणी आले. आजही कोरेगाव तालुक्यात काही गावे दुष्काळी आहेत. या गावांना पण कायमस्वरूपी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. या वंचित गावांचा समावेश जिहे-कठापूर योजनेत करण्यात आला आहे. या योजनेचे पाणी रामोशी वाडी पासून भाडळे पर्यंत तर शिल्टी, खिरखिंडी, अपशिंगे, वाघजाईवाडी, एकंबे, भंडारमाची, बोधेवाडी, रुई, आझादपूर, अंबवडे, किन्हई, नागेवाडी, हसेवाडी, चिलेवाडी, पिंपोडे खुर्द, देऊर, पळशी, भक्तवडी, रेवडी या गावांना मिळणार आहे. वांगणा वाहती होणार आहे. त्यामुळे प्रवाहीत होणा-या पाण्यामुळे चिमणगाव, सांगवी ओढा प्रवाहीत होणार आहे. यामुळे मतदार संघातील गावे बारा महिने सिंचनाखाली येणार आहेत.
विरोधक केवळ राजकारण करतात. त्यांनी आपले पाणी सांगलीला दिले. काहीच करता आले नाही म्हणून ते फक्त फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत. कोरोना महामारीत जसे काम केले तसे काम सिंचनासाठी करणार आहे. तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सिंचनासाठी तिहेरी योजना आखली आहे. त्यामुळे भविष्यात सिंचनाचे सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आ. महेश शिंदे यांनी सांगितले. यावेळी कोरेगाव मतदारसंघात आ. महेश शिंदे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Social Plugin