महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत, मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ हे विशेष अभियान शंकरराव भेलके महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात आले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांनी सर्व सहकारी प्राध्यापक तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांना लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. या अभियानाच्या माध्यमातून नसरापूर , कातकरी वस्ती चेलाडी, नायगाव, देगाव, कामथडी या पंचक्रोशीतील सर्व मतदारांना माझे मत लोकशाही संवर्धनासाठी , माझं मत माझा अधिकार अशी घोषणा वाक्य वापरून डॉ. सचिन घाडगे यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले. मतदान यंत्रांचा वापर कसा करावा, मतदानाची वेळ, मतदान करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे इ. माहिती राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा जाधवर डी एस यांनी दिली.
Social Plugin