Ticker

6/recent/ticker-posts

इंडो तिबेटीयन पोलीसांच काम ऐकाच्याही डोळ्यात भरल नाही, याचं आश्चर्य!

 मतदान आपल्या गावचं,पण सावरायचं बाहेरच्यानी!पडद्यामागच्या कलाकारांच्यावर कौतुकाची थाप कधी पडणार!!!!


छायाचित्र प्रकाश २ाजेघाटगे -विसापूर ता खटाव येथील एका मतदान केंद्रावर खांद्यावर बंदूक,आणि हातात लाठी, असलेल्या खाकी वर्दीतील देव माणूस लोकशाहीच्या उत्सवात त्या वयोवृद्ध नागरीकांचा काहीही संबंध नसताना मतदान केंद्रापर्यंत मदत करताना 


बुध   दि .[ प्रकाश राजेघाटगे ] 

आता मतदान झालय, ज्यांच्यासाठी हा अट्टाहास केला त्या संबंधितांकडून सर्वांचा गवगवा ही झाला, पण गावोगावीच्या पथकात रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून ,चौका चौकात गस्त घालत वाहनांची तपासणी केली, मतदानाच्या दिवशी जिवाचं रान केलं , कुठल्याही,कसल्याही प्रकारचा गोंधळ कुठेच मतदान केंद्रावर उडू दिला नाही, खांद्यावर बंदूक,आणि हातात लाठी असलेल्या खाकी वर्दीने लोकशाहीच्या उत्सवात  वयोवृद्ध नागरीकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी मदत केली त्यांच्या पाठीवर कुणीही कौतुकाची थाप मारली नाही याची खंत गावोगावच्या नागरिकांमधून होत आहे.

        झालं एकदाचं इलेक्शन! सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गावोगावच्या पुढाऱ्यानी,

कार्यकर्त्यांनी जिवाचं रान केल, मतदानाचा टक्का ही वाढला . मतदार घराबाहेर काढताना ज्या कसरती कार्यकर्त्यांनी केल्या,गेले आठ दहा दिवस कशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला , घराघरांत जाऊन कसं ही करा पण आम्हालाच मत द्या हा कार्यक्रम कसा कसा केला,त्याचं पोती पुराण ही झालं , प्रत्येकाच्या नेत्यानं मतदान झाल्या नंतर रात्री आढावा बैठक घेऊन तोंड भरून सर्वांचं कौतुक ही केलं. गावागावात , पारावर, चावडीवर, चौकात ,कोण जिंकणार यावरून पैजा ही लागल्या आहेत,पण ही मतदान प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पाडण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी,आपल्या जिल्हा पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी इतर राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या इंडो तिबेटीयन पोलीसांच काम ऐकाच्याही डोळ्यात भरल नाही, याचं आश्चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया जनमाणसातून येत आहे. ग्रामपंचायत, कृषी, बांधकाम , घरोघरी शासनाच्या वतीने मतदाराच्या स्लीप पोहोच करणारे बी एल ओ, अंगणवाडी सेविका व अन्य विभागातील कर्मचारी आणि रात्रंदिवस ज्या अधिकाऱ्यांनी गस्ती पथकाच्या माध्यमातून अहोरात्र मेहनत घेतली.ना ओळखीचा ना पाळखीचा, सर्वांच्याच गाड्या, बॅगा तपासल्या याची कुठल्याही उमेदवाराला ,ना पुढऱ्याला ना कार्यकर्त्यांना जाणीव झाली नाही. त्यांचं ते कामच आहे,ते करताहेत अशी भावना सर्वत्र दिसून आली.पण हे  आपल्याच साठी सुरू आहे याचा माञ विसर पडलेला दिसून आला.


 दीर्घ आजाराने घरात झोपलेल्या ग्रस्त मतदाराला केवळ एका मतासाठी कार्यकर्ते रिक्षा, किंवा चारचाकीतून  मतदान केंद्रावर आणायचे, सोडायचे आणि पुढचं मत , मतदार आणण्यासाठी निघून जायचे. त्याचं एकदा का मतदान झालं की आपला विषय संपला.मग आणलेली ती व्यक्ती कशी मतदान केंद्रात जाईल,तिला, किंवा त्याला कोणाचा आधार नाही, ती व्यक्ती परत कशी सुखरूप आपल्या घरी जाईल याचा विचारही बऱ्याच ठिकाणी झाला नसल्याचे दिसून आले.अशा वेळी  खाकी वर्दीतील देव त्या वृध्द, निराधार आणि अपंगांसाठी धावून आल्याचे रांगेत उभे असलेल्या ग्रामस्थांनी पाहिले.

खांद्यावर बंदूक,आणि हातात लाठी,परंतु खाकी वर्दी लोकशाहीच्या उत्सवात वयोवृद्ध नागरीकांना मतदान केंद्रापर्यंत मदत करताना दिसून येत होते.

          कोरेगांव खटाव मतदासंघांतील विसापूर ता खटाव येथे एका महिला मतदाराला मतदानप्रक्रिया पार पाडण्यासाठी पुसेगाव पोलिस ठाण्याच्या सपोनी संदीप पोमन यांच्या मदतीने इंडो तिबेटीयन पोलीसांचे मोलाचं सहकार्य लाभले. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्याचा पदभार घेतल्यापासून सर्व सामान्य नागरीकांच्या अडी, अडचणी,व त्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्परता दाखवली आहे.याचे सांघिक श्रेय त्या कर्णधाराला नक्कीच जाते यात शंका नाही.