बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
दि 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 करीता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, त्या अनुषंगाने पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत सातारा जिल्हा पोलीस दल, केंद्रीय सुरक्षा दल यांचे वतीने 1 महिन्यात गावागावात जावून संदीप पोमण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुसेगाव पोलीस ठाणे यांनी संचलन करून जनतेत निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी संदेश दिलेला आहे .
दि 20 नोव्हेंबर रोजीचे मतदान प्रक्रियेत कोणतीही बाधा निर्माण होवू देणार नाही आम्ही प्रत्येक परिस्थिती हाताळून शांततापूर्ण वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज आहोत असा संदेश यातून देण्यात आला आहे. तसेच सर्व मतदारांनी स्वतःचा मतदानाचा अधिकार 100 टकके बजावावा असेही आवाहन करण्यात आले आहे.आज रोजी मुंबई पोलीस दल व सातारा जिल्हा पोलीस दल यांचे वतीने पुसेगाव शहरात संचलन करण्यात आले आहे.
मतदानासाठी पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत 82 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार असून त्यासाठी 5 पोलीस अधिकारी, 80 पोलीस अंमलदार, 60 होमगार्ड, संवेदनशील गावात केंद्रीय सुरक्षा दलाचे 12 जवान, पेट्रोलिंग करीता 5 वाहने, आचारसंहितेचे पालन पडताळणी साठी भरारी पथक व स्थायी निगराणी पथक तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती सपोनि संदिप पोमण यांनी दिली .
Social Plugin