Ticker

6/recent/ticker-posts

मत्स्योदरी विद्यालय अंबड च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम सपन्न



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ


आज मत्स्योदरी विद्यालय अंबड सन-२००४ चे स्नेहमिलन कार्यक्रम मातोश्री कृषी पर्यटन केंद्र लालवाडी या ठिकाणी उत्साहात पार पडला.सदर कार्यक्रमांमध्ये वर्गामधील सर्व विद्यार्थी व काही शिक्षक वृंद कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ढोल ताशा च्या गजरामध्ये सर्व शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी  यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला सध्याचा व्यवसाय व आपण घेतलेले शिक्षण तसेच आजपर्यंत आपण केलेले वैशिष्ट्यपूर्ण काम याचा परिचय करून दिला व त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक वृंद आदरणीय श्री प्रभाकर शेळके सर,श्री यु बी सोळंके सर,श्री व्ही डी जाधव सर,श्री तीर्थराज गोरडे सर,सौ आशाताई नागे मॅडम,श्री बळीराम शिंदे सर, श्री भागवत काळे सर,श्री ज्ञानेश्वर अवढळ सर,श्री बटूळे सर यांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले व जीवनामध्ये जगत असताना कोणते मूलमंत्र आत्मसात केले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती दिली.

श्री अतुल घोगरे यांनी शालेय जीवनातील विविध आठवणी जागृत करून सर्वांना बालपणात घेऊन गेले व त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी मातोश्री कृषी पर्यटन केंद्र येथील परिसरात फेरफटका मारून निसर्गाचा आस्वाद घेतला, काहींनी बोटिंग केली,सर्वांनी डान्स केला,सीताफळे पेरू यांचा आस्वाद घेतला त्यानंतर सर्वांनी एकत्रित जेवणाचा आस्वाद घेतला जेवण झाल्यानंतर बालपणात खेळलेले खेळ त्यामध्ये तळ्यात मळ्यात,सेम हॅन्ड सेम लेग, संगीत खुर्ची इत्यादी खेळ खेळून सर्वांनी आनंद घेतला व शेवटी सर्वांनी फोटोसेशन केले .


कार्यक्रमासाठी विशेष करून  प्रितम बाकलीवाल,चेतन चंडोल, संदीप काळे, सुचिता मोतींगे, दुर्गेश कुलकर्णी यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला त्याचे सर्वांच्या वतीने आभार व सत्कार करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला