*जावळीत विजयाचा अमरपट्टा बागळणाऱ्या नेत्याला कोरेगांवकरांनी दोनदा दिला धोबीपछाड*
बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत कोरेगाव येथील झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांचा उल्लेख माझा भरवशाचा बॅटमन असा केला होता. मुख्यमंत्री यांनी केलेल्या उल्लेख सार्थ ठरवत आमदार महेश शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत जोरदार बॅटिंग करून विरोधकांचा चारीमुंड्या चीत करून पराभव केला.त्यामुळे आगामी काळात आमदार महेश शिंदे यांचा उल्लेख कोरेगावचा तेंडुलकर असा झाल्यास वावगे ठरणार नाही.
सच्च्या नेत्याजवळ एकटय़ानं झुंझायचं धैर्य असतं.अतिशय कटू व कठोर निर्णय घेण्याचे सामर्थ्य असावे लागते.इतरांचे म्हणणं सुज्ञपणे ऐकून घेण्याची हिंमत असते.तसेच त्याच्या मनातील ध्येयाशी एकरूप होण्याची ताकद असते.नेतृत्व करणं हे मोठं अवघड काम असते.कणखर असणे पण उद्धट न बनणे, दयाळू असणे पण दुर्बल नसणे, धीट असणे पण आक्रमक नसणे, विचारी असणं पण आळशी न बनणे, नम्र असणे पण भित्रेपणा न येऊ देणे, अभिमानी असणे पण उर्मट नसणे, विनोदबुद्धी जोपासणे पण त्याला मूर्खपणाचा लवलेशही येऊ न देणे,अशी कसरत नेत्याला कुशलपणे सांभाळायला लागते..उत्तम नेतृत्वासाठी आवश्यक गुण म्हणजे माणुसकी, स्पष्टपणा आणि धैर्य असत आणि या सर्व गुणांचा संगम असलेले कोरेगाव आमदार श्री.महेश शिंदे यांनी सन 2019साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय हा अपघाताने नव्हे तर स्वकर्तुत्वाने झाला होता हे या निवडणुकीतील विजयाने सिद्ध झाले आहे.
*कोरोना काळातील आधारवड*
कोरोनाच्या जागतिक महामारीत खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाचा कस लागला,पण याही परिक्षेत ते विशेष प्रावीण्य राखून आहेत असेच म्हणावे लागेल.या जागातिक महामारी नातलग सुध्दा मदत करत नसताना हा माणूस तालुक्याचा पालक म्हणून पुढे आला. पहिल्या लाटेत स्वखर्चाने कोविड हाँस्पिटल चालू करून कित्येक गोर-गरीब जनतेचे प्राण वाचवले.पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱ्या लाटेतही चार कोविड सेंटर चालू करून उत्कृष्ट लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ त्यांना सामान्य जनतेला दाखवून दिला.याच सामान्य जनतेच्या प्रेमरूपी मताच्या आशीर्वादावर त्यांनी पुन्हा एकदा श्री शशिकांत शिंदे यांचा दारुण पराभव केला
गेली 50 वर्षे पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या दुष्काळी जनतेच्या जीवनात जिहे-कटापूर कटापूर पाणी योजनेच्या माध्यमातून पाणी योजनेच्या माध्यमातून आमदार महेश शिंदे यांनी नंदनवन फुलवले आणि याच गोष्टीच्या बळावर ते विधानसभेला मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे गेले आणि लोकसभेला आमदार शशिकांत शिंदे यांना कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मिळालेली आघाडी ही किती थोतांड आहे हीच आजच्या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
*चारदा पराभव*
आमदार शशिकांत शिंदे हे स्वतःचा उल्लेख वारंवार निष्ठावंत असा करतात ते काही वेळ सत्य जरी मानले तरी जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर कामाचा सत्यपणा जनता जनार्दनांना लागतो हे आमदार शशिकांत शिंदे विसरले दिसत आहे नाहीतर त्यांच्यासारख्या ताकदवान नेत्याचा सलग चार निवडणुकीत पराभव झाला नसता. कोरोना काळात आमदार महेश शिंदे व कुटुंबीय जनतेच्या सेवेत असताना स्वतःला निष्ठावंत म्हणून घेणारे दाढी वाढवून फेसबुक वरून जनतेला विशेषतः कोरेगाव येथील जनतेला आरोग्याबाबत सल्ले देत होते. हे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखेच आहे असे सामान्य जनतेला वाटत असल्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या होमगार्ड वर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
*दोन्ही राजेंची साथ*
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सातारा तालुक्यातील येणाऱ्या गावांमधून दोन्ही राजांनी आमदार महेश शिंदे यांना मोलाची साथ दिली हे विशेष नमूद करावे लागेल. खरे तर यातील काही गांवे पूर्वीच्या जावळी मतदार संघात येत असून सुद्धा आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा तालुक्यात गेल्या वेळी प्रमाणे याही आपला कार्याचा वरदहस्त राखणे जमले नाही. लोकसभेला आमदार महेश शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी प्रामाणिकपणे खिंड लढवली होती. महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळेस आमदार महेश शिंदे यांच्यासाठी पहिल्यापासूनच प्रयत्न चालू केले होते कोरेगाव येथे पार पडलेल्या सभेत उदयनराजे यांनी केलेले भाषण त्याचाच परिपाक म्हणावा लागेल.
*जलपूजन ते विकासपर्व*
जिहे कटापूरची गेली तीस वर्षे रकडलेली योजना आमदार महेश शिंदे यांच्या कालखंडात सुरू झाली.कोरेगाव तालुक्याच्या इतिहासात स्वखर्चाने अनेक विकासकामे केली विशेषतः कोरेगाव शहरासाठी मोठा निधी आणून कोरेगाव जनतेचा मार्गक्रमण सुलभ होण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला. कायम काँग्रेसी विचारसरणी असलेल्या तालुक्यात शिवसेना सारख्या उजव्या संघटनेचा आमदार निवडून का येतो याचे उत्तर त्यांच्या गेल्या पाच वर्षाच्या कार्यातून जनतेला मिळाले आहे त्यामुळेच महेश शिंदे हे अति भव्य मताच्या फरकाने निवडून आले असेच बनावे लागेल.
सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे जसा भारताचा स्टार खेळाडू सचिन तेंडुलकर संघाच्या विजयासाठी कधी फलंदाजी तर कधी गोलंदाजी करण्यासाठी कायम प्रयत्नशील होता त्यामुळे भारतीय संघाला अनेक अशक्यप्राय विजय शक्य झाले तर त्याचप्रमाणे आमदार महेश शिंदे जनतेच्या विकासासाठी कायम तत्पर असलेले कोरेगावच्या जनतेने मागील पाच वर्षात पाहिले. रस्त्यावरचा संघर्ष असो किंवा सभागृहातील हिंदुत्वाचा विषय ते नेहमीच अग्रभागी राहिलेले आहेत त्यांचा हिंदुत्वाचा फटका आमदार अमोल मिटकरी यांना कायम लक्षात राहील असंच होतं. म्हणून असा हरहुन्नरी आमदार येणाऱ्या काळात विकासकामांची फटकेबाजी नक्कीच करेल हे जनतेला सार्थ विश्वास असल्यामुळे त्यांचे नेतृत्व असेच बहरत जाईल.
विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना यामुळे जनतेत विशेषतः महिला वर्गात अतिशय चांगली भावना महायुतीच्या सरकार बद्दल झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेलेली महायुती विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आली असे जाणकारांचे मत आहे.
Social Plugin