पुष्पावत्ती विद्यालय डिंगोरे ता. जुन्नर जिल्हा, पुणे .या शाळेत 14- 10- 2024 रोजी सकाळी प्रभात फेरी काढून सर्व स्री- पुरुष मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले .इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन गावातील सर्व पेठांमधून जाऊन मतदान करण्यासाठी जनजागृती करण्याची काम केले. यावेळी पाचवी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली
*घोषणा*
1मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो
2 मतदान करूया, लोकशाही वाचूया.
3 चला मतदान करूया, देशाची प्रगती घडवूया .
4आद्य कर्तव्य भारतीयांचे, पवित्र कार्य मतदानाचे.
5 जागृत नागरिक होऊया, अभिमानाने मत देऊया.
6 ना जातीवर ना धर्मावर ,बटन दाबा कार्यावर.
7सोडा सारे काम धाम,मतदान करणे पहिले काम.
8 मतदानासाठी वेळ काढा ,आपापली जबाबदारी पार पाडा.
या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
यावेळी गावातील सरपंच ,उपसरपंच, सर्व सदस्य तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी यावेळी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.सर्व ग्रामस्थ विद्यार्थ्यांच्या घोषणांना प्रतिसाद देत होते. विद्यार्थ्यांच्या जनजागृतीचे स्वागत करण्यासाठी घराघरातील लहान ,थोर, वयस्क सर्व ग्रामस्थ पेठांच्या मोकळे जागेत येऊन शिक्षकांचे ,विद्यार्थ्यांचे कौतुक करत होते . प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहिजे, ते आपले कामच आहे .तसे मतदान करणे हे आपले प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि आम्ही मतदान करणार अशी ग्रामस्थ विद्यार्थ्यांना सांगत होते.
यावेळी पुष्पावती विद्यालय डिंगोरे ता. जुन्नर जिल्हा पुणे चे मुख्याध्यापक- श्री प्रतीक अकोलकर सर, शिक्षक प्रतिनिधी -श्री जगन्नाथ गाढवेसर. सौ तांबे साधना मॅडम .शिल्पा भालेराव मॅडम.श्री रतीलाल बागुल सर. श्री वैभव देशमुख सर. श्री दिनेश पाटील सर. श्री काकडे सर .श्री मंगेश डुंबरे सर सर .श्री कोंडार मंगेश सर व सेवक श्री उकिर्डे दादा,
शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते. डिंगोरे गावातील सर्व ग्रामस्थ मतदारांनी या जनजागृतीला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
Social Plugin