संजय भोसले :
तळेरे येथील श्री देव गांगेश्वर मंदिर आणि श्री खर्जादेवी मंदिरात शुक्रवारी भक्तिमय वातावरणात त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी भक्तिमय वातावरणात कार्यक्रम साजरे करण्यात आले.
यानिमित्त दुपारी महाप्रसाद, सायंकाळी देवीच्या ओटी भरणे आणि त्यानंतर पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरे झाले. यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत श्री खर्जादेवीची ओटी भरण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या. या उत्सवासाठी मुंबईस्थित चाकरमानीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin