*कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या सन.2002-03च्या दहावीच्या बॅच चे स्नेहसंमेलन थाटात संपन्न*
संजय भोसले,
प्रिय अशीही माझी शाळा, तिच्यावर मी काय लिहावे,महती तिची गाता शब्दांनी ही कमी पडावे असेच विचारच मनात बाळगून 'गेट टुगेदरसाठी' येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाळा आणि आपल्या शिक्षकांविषयीची आपुलकीची व कृतज्ञतेची भावना लक्षात येते,असे गुणी विद्यार्थी मिळाले हे आमचे भाग्य म्हणावे लागेल असे गौरवोद्गार कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका श्रीम.सुशीला सावंत यांनी कासार्डे विद्यालयात केले.
कासार्डे माध्यमिक विद्यालय सन.२००२-०३ दहावीच्या बॅचच्या गेट टुगेदर कार्यक्रमात बोलत होत्या.
सदरची दहावीची बॅच तब्बल २१ वर्षानंतर भेटले आणि "'एक दिवसाची शाळा शिकूया! पुन्हा लहान होऊया!" असे स्लोगन घेऊन माजी विद्यार्थी व विद्यार्थ्यिनी यांचे स्नेहसंमेलन कासार्डे हायस्कूलच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर स्कुल कमिटी पदाधिकारी सुभाष पाताडे,दिलीप शेलार, सेवानिवृत्त शिक्षक अशोक मुद्राळे, सेवानिवृत्त कलाशिक्षक सी.एस कल्याणकर,सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन.सी.कुचेकर,सेवानिवृत्त पर्यवेक्षक एस.डी.भोसले,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.बी.बी.बिसुरे पर्यवेक्षक एस.व्ही.राणे, जेष्ठ शिक्षक ए.पी.घुले, क्रीडा शिक्षक डी.जे.मारकड,पी.जे.काळे,यशवंत परब, वरिष्ठ लिपिक श्रीम.सुनिता कांबळे,
ग्रंथपाल विठोजी राणे,सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी बाबल्या कदम,श्री. पांचाळ, शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमोल जमदाडे यांनी केले.
तत्पूर्वी सेवानिवृत्त शिक्षिका श्रीम.सुशीला सावंत यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून तर सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक तथा स्कुल कमिटी सदस्य सुभाष पाताडे व दिलीप शेलार यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वतीच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून स्नेहसंमेलनाचा शुभारंभ झाला.
*शिक्षकांचा छ.शिवाजी महाराज यांची मुर्ती देऊन सत्कार*
दहावी सन-२००२-०३ बॅचच्यावतीने माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर तसेच आपले गुरुवर्य-शिक्षकांचा शाल,पुष्पगुच्छ व छ.शिवाजी महाराज यांची मुर्ती भेट देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री.घुले,श्री.राणे,श्री. कुचेकर,श्री.मारकड,श्री.काळे,श्री. भोसले,श्री.कल्याणकर,श्रीम.कांबळे आदींसह बहुसंख्य माजी विद्यार्थीवर्गाने आपले मनोगत व्यक्त करताना अनेक आठवणींना उजाळा दिला.
तर संस्था पदाधिकारी दिलीप शेलार यांनी संस्थेच्यावतीने स्नेहसंमेलनात उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधीक स्वरूपात शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि प्रशालेच्या सर्वच माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन केले.
*शाळेची खरी ओळख गुणवंत शिक्षक व विद्यार्थीवर्गामुळेच- सुभाष पाताडे*
सुभाष पाताडे यांनी शाळेच्या स्थापनेपासून इतिहास कथन करून कासार्डे विद्यालयाची ओळख ही गुणवंत आणि आदर्श विद्यार्थ्यांमुळे निर्माण झाल्याचे सांगत मेहनती शिक्षकवर्गामुळे असे गुणी विद्यार्थी घडत असल्याचेही बाब विशेष नमूद केली.
मुख्याध्यापिका सौ बिसुरे यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला कम्प्युटर भेट दिल्याबद्दल विशेष धन्यवाद देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.अभार अमोल जमदाडे यांनी मानले.त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचे 'लोटस हेरिटेज रिसॉर्ट'तळेरे येथे स्नेहभोजन व फनिगेम्सनी गेट-टुगेदर ची सांगता झाली.स्नेहसंमेलनात सन २००२-०३ मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कासार्डे माध्यमिक विद्यालयातील सन -2002 -03 बॅच सोबत संस्था पदाधिकारी, माजी व आजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी
Social Plugin