Ticker

6/recent/ticker-posts

विद्यामंदीर इंग्लीश मिडियमच्या विद्यार्थ्यानी आसलदे वृद्धाश्रमातील आजी-आजोबा सोबत केली अनोखी दिवाळी



संजय भोसले 

कणकवली येथील विद्या मंदिर हायस्कूल इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांनी असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात पारंपारिक पध्दतीने अनोखी दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या निमित्ताने 50 विद्यार्थ्यांनी या आश्रमाला भेट देत आजी आजोबांना वेगळा अनुभव दिला. 

यावेळी दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबानी विद्यार्थ्यांना दिवाळी शुभेच्छा म्हणून पारंपरिक उटणे वाटून शुभेच्छा दिल्या. तर विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष दिविजा वृद्धाश्रमात येउन आजी आजोबा सोबत दिवाळी साजरी केली. जवळ जवळ 50 विद्यार्थी आजी आजोबासाठी दिवाळीचा फराळ व भेटवस्तू घेऊन आले. यावेळी आपली नातवंडे दिवाळीच्या सणाला भेटायला आली हे पाहून आजी आजोबांच्या डोळ्यात आनंदाअश्रू आले. 

नातवंडे आजी आजोबानी दिवाळीचा धनतेरस दिवस साजरा केला. नातवंडानी आणलेल्या फराळचा आस्वाद आजी आजोबानी घेतला व जड अंत करणाने आपल्या शालेय नातवंडांना निरोप घेतला. यावेळी आपल्या ह्या नातवंडाना आजी आजोबानी भरभरून  आशीर्वाद दिले.


सामाजिक जाणीव जागृती

अलीकडील समाजाची बदलती मानसिकता लक्षात घेता कुटुंब व्यवस्था विस्कळीत बनली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमात ठेवले जाते. त्यांच्या प्रती सामाजिक जाणीव जागृती निर्माण व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात आले.