Ticker

6/recent/ticker-posts

सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू भाजपा पाठपुराव्याला यश



बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]

 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे सातारा ते आयोध्या बस सेवा सुरू करण्यात आली, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी यासाठी पत्र व्यवहार करून, मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि श्रीराम भक्तांच्या पाठपुराव्याला यश आले अशी प्रतिक्रिया यावेळी विकास गोसावी यांनी व्यक्त केली 

सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्वसामान्य लोकांना अयोध्या आणि परिसरातील तीर्थक्षेत्रे पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अभिनंदन करण्यात आले 

सातारा ते अयोध्या ही बस  शेगाव ते नागपूर मार्गे आयोध्या आणि परतीच्या प्रवासात वाराणसी, प्रयागराज ,  उज्जैन , ओंकारेश्वर चे दर्शन घेऊन परत सातारा असा पाच दिवसांचा प्रवास करणार आहे, जवळजवळ चार हजार किलोमीटर अंतर असलेल्या या प्रवासासाठी आरामदायी पुश बॅक सीट असलेल्या गाड्या उपलब्ध करण्यात आल्या असून प्रवासी भाडे प्रत्येकी सात हजार पाचशे ठेवण्यात आलेले आहे, यामध्ये निवास आणि भोजनाचा खर्च समाविष्ट करण्यात आलेला नाही , एका गाडीमध्ये पंचेचाळीस  प्रवाशांची व्यवस्था करण्यात आलेली असून, प्रवासी उपलब्ध झाली की लगेच बस सोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती सातारा स्थानक प्रमुख  राहुल शिंगाडे यांनी दिली 

यावेळी प्रवास करणाऱ्या श्रीराम भक्तांना, चालक , वाहक आणि उपस्थितांना भारतीय जनता पार्टीतर्फे पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला आणि त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या, सर्वांनी यावेळी " जय श्रीराम"  चा जयघोष केला

यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, नितीन कदम, शहर उपाध्यक्ष जयराम मोरे, विजय नायक, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, पर्यावरण अभियानाचे जयदीप ठुसे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे तसेच आगर व्यवस्थापक शिंदे साहेब स्थानक प्रमुख शिंगाडे साहेब तसेच आगारातील कर्मचारी श्री.मंगेश शेलार,सुशिल साबळे, चालक श्री.अजित काटे सौ.रोहिनी शिंदे, हर्षदा गवळी, रेहाना इनामदार, प्रकाश घोरपडे आणि इतर कर्मचारी आणि आगारातील प्रवाशी उपस्थित होते