प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
मलकापूर :- सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे योद्धे, दूरदर्शी राजकारणी, आदरणीय समाजसेवक होते. त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणूनही ओळखले जाते. सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री झाले. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यलढ्यात जनतेला भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेण्याची प्रेरणा दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार समाजासाठी, युवकांसाठी, देशासाठी, आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. आज सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार या देशातील नेत्यांना तसेच प्रत्येक नागरिकाला माहित असणे आवश्यक आहे.
आज सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण तालुक्यामध्ये तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल सार्वजनिक जयंती उत्सव समिती मलकापूर, बुलढाणा, मोताळा, नांदुरा, मुक्ताईनगर आणि बोदवड या प्रमुख शहरातील हजारो समाज बांधवांनी मलकापूर येथील जनता कॉलेज येथून जयंतीच्या विविध कार्यक्रमाला सुरुवात झाली व लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य रॅलीच्या आयोजन करण्यात आले टाळ मृदंगाच्या गजरामध्ये रॅली मलकापूर मधील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करत होती या रॅलीमध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला व युवकांचे मोठी उपस्थिती होती .
Social Plugin