Ticker

6/recent/ticker-posts

अंचरवाडी ग्रामपंचायत येथे संविधान दिन साजरा



संजय गवई अंचरवाडी 

सरपंच सौ कोकिळा ताई परिहार, उपसरपंच ज्योती ताई परीहार यांच्या उपस्थतीमध्ये संविधान दीन साजरा करण्यात आला अध्यक्ष स्थानी ज्ञानेश्वर परीहार होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन राज्य घटना 26नोव्हेंबर 1949रोजी देशाला अर्पण केली त्या घटनेला आज पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत असुन प्रत्येक नागरिकाने भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला आपल्या हक्क आणि अधिकार याची जान असायला हवी असे सांगितले.

 गावातील प्रतिष्ठित नागरिक समाधान परीहार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, सुनील परिहार, सखाराम परीहार, एकनाथ बाबा, साहेबराव परीहार, तेजराव गवई  तसेच ग्राम पंचायत सदस्य केशव परिहार, रामचंद्र शिंदे उद्धव चव्हाण, ज्ञानु चव्हाण, शाम राठोड, युवराज परिहार, सुगदेव गवई, गणेश राणा, संजय गवई, ग्राम पंचायत कर्मचारी व गावातली मंडळी हजर होती.