तीन एकर कपाशीमध्ये शेतकऱ्याने चालवले ट्रॅक्टर,
प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
मलकापूर,:- बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यामधील बरेच शेतकरी आपल्या शेतामध्ये कपाशीचे पीक घेतात आणि आपला उदरनिर्वाह करता परंतु गेल्या काही वर्षांमध्ये वातावरणातील बदल, पावसाचे अनियमितता, बोंड अळीचा प्रादुर्भाव अशा अनेक कारणांनी कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे . हजारो रुपये खर्च करून सुद्धा खर्च सुद्धा निघत नसल्याकारणाने शेतकरी मोठा हवालदार झाला असून त्याने चेक्क आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवायला सुरुवात केली आहे मलकापूर तालुक्यातील गिरणी या शिवारातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये चक्क ट्रॅक्टर चालून कपाशी उध्वस्त केले व आपल्या स्वप्नांवर नांगर चालवला
शेतकऱ्यांचा सरकार विरोधात नाराजीचा सूर,
गेल्या अनेक दिवसापासून कापूस उत्पादक शेतकरी कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी सरकार दरबारी लोटांगण घालत आहे की कापसाला दहा हजार प्रति क्विंटल भाऊ द्या मात्र शेतकरी नेहमीच शेतकऱ्याच्या हातावर तुरी देत आहे 23 तारखेला विधानसभेचा निकाल जाहीर झाला सर्वांना आश्चर्याचा धक्का देत महायुतीला भरघोस मतांनी जनतेने विजय केले आता शेतकऱ्याच्या मनात हाच विचार आहे की येणार सरकार कापसाला चांगला भाव देईल व शेतकरी सुखी व समृद्धी होईल हीच आशा शेतकरी व्यक्त करत आहे.
Social Plugin