Ticker

6/recent/ticker-posts

सेवागिरी महाराजांच्या रथोत्सव उत्साहात पार पाडू: चेअरमन डॉ सुरेश जाधव


प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने यंदा प्रथमच साधूंच्या साठी टेंट उभारण्यात येणार 

बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या ७७ व्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार दिनांक २९ डिसेंबर रोजी  महाराजांचा रथोत्सव सोहळा तसेच दहा दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल या यात्रा प्रदर्शनात होणार आहे.देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ,भाविक आणि प्रशासनाच्या मायक्रो प्लॅनिंग ने यंदाचा सेवागिरी महाराजांच्या रथोत्सव उत्साहात पार पाडू असे प्रतिपादन चेअरमन डॉ सुरेश जाधव यांनी केले.

      सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रा नियोजनाबाबत तसेच यात्रा कमिटी स्थापन करणेबाबत गुरुवारी (दि ७)  सकाळी १० वाजता सेवागिरी मंदिरातील प. पू. नारायणगिरी भक्तनिवास हॉल येथे ग्रामसभा पार पडली.

मठाधिपती महंत प पू सुंदरगिरी महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत चेअरमन डॉ सुरेश जाधव बोलत होते. यावेळी माजी चेअरमन रणधीर जाधव,बाळासाहेब जाधव , विश्वस्त संतोष वाघ, गौरव जाधव, सचिन देशमुख तसेच ट्रस्ट चे माजी चेअरमन, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते, मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी माजी चेअरमन रणधीर जाधव यांनी उपस्थिंचे स्वागत केले,नूतन चेअरमन डॉ सुरेश जाधव  प्रास्ताविक करताना  शासकीय विद्यानिकेतन परिसरातील सुमारे ३२ एकर जागेचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल , निढळ ते वर्धनगड पर्यंत महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड उपक्रमाबाबत तसेच देवस्थान ट्रस्ट मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी केल्याबद्दल रणधीर जाधव व सर्वांचे कौतुक केले. सर्वांच्या सहकार्याने यंदाचा रथोत्सव व वार्षिक यात्रा अत्यंत सूक्ष्म नियोजन करून उत्साहात पार पाडू असे नमूद करून डॉ जाधव म्हणाले 

देवस्थान ट्रस्टचा नावलोकिक देशभरात पसरावा म्हणून यावर्षी महाराजांचे देशभरातील शिष्य असलेल्या आणि उत्तरप्रदेशमध्ये प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तांच्या साठी यावर्षी प्रथमच देवस्थान ट्रस्ट च्या वतीने टेंट उभारण्यात येणार असल्याचे डॉ सुरेश जाधव यांनी सांगितले.

      यात्रेकरू आणि भाविकांसाठी मंदिर परिसर व यात्रा स्थळाजवळ सोयिंसुविधा युक्त पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना माजी चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी केली. यात्रेदरम्यान साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांत मैदानी खेळांचा समावेश करून तरुणांचा सहभाग वाढवावा असा विचार सचिन जाधव यांनी व्यक्त केला. यात्रेतील सर्व इव्हेंटचे खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून अतिरिक्त होणाऱ्या खर्चात बचत करण्यात यावी अशी सूचना सुरेश जाधव यांनी केली. 

. सूत्रसंचालन सचिव विशाल माने यांनी केले. संतोष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष वाघ यांनी आभार मानले.