Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये वामनराव महाडिक हायस्कूलचे यश


 संजय भोसले. 

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग व नेहरू युवा केंद्र,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.यावेळी विविध स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेमध्ये वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश संपादन केले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अनिल पाटील,शारदा पवार, उपजिल्हाधिकारी,आदरणीय भूसंपादन अधिकारी,आरती देसाई,मुकुंद चिलवन,जिल्हा माहिती अधिकारी,जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस,इतर मान्यवर,जिल्ह्यातील शिक्षक, स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते. 

            याप्रसंगी सांघिक विज्ञान प्रतिकृती निर्मितीमध्ये प्रशालेने द्वितीय क्रमांक पटकावला, यामध्ये अंकिता शिंदे,चैताली तळेकर,लक्षण नांदगावकर, मानसी पाष्टे यांनी प्रतिकृती सादर केली होती.प्रशालेच्या प्राध्यापिका रोहिणी जाधव यांनी त्यांना मार्गदर्शन केले.वैयक्तिक विज्ञान प्रतिकृती निर्मितीमध्ये प्राध्यापिका नूतन भावे यांना प्रथम क्रमांक मिळाला.समूह लोकगीत प्रकारात तृतीय क्रमांक मिळाला,यामध्ये आर्या घाडी, तक्षिल तळेकर,मयुरी तळेकर, मनस्वी बारस्कर,नमित मेस्त्री, सावली पेडणेकर,सिद्धी मेस्त्री हे  विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना प्रशालेचे शिक्षक अजित  गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.  मोबाईल फोटोग्राफी मध्ये ऋषिकेश मेस्त्री प्रथम तसेच कौस्तुभ तेरवणकर याने द्वितीय क्रमांक मिळविला असून पी.एन. काणेकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

        प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्या प्रोत्साहनाने व शिक्षिका सुचिता सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी उज्वल असे यश संपादन केले. प्रशालेचे शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर, प्रवीण वरूणकर,संतोष जठार, प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,यांनी विजेत्यांचे गुलाबपुष्प देऊन कौतुक केले.